डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कासाठी नामांकन

Donald Trump nominated for Nobel Peace Prize

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना नोबेल शांतता पुरस्कासाठी (Nobel Peace Prize) नामांकन मिळालं आहे. २०२१ च्या पुरस्कारांसाठी हे नामांकन मिळालं आहे. इस्त्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीमधील संघर्षामध्ये मध्यस्थी करुन दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी ट्रम्प यांनी बजावलेल्या भूमिकेसाठी हे नामांकन देण्यात आलं आहे.

नॉर्वेच्या संसदेचे सदस्य क्रिश्चियन टायब्रिग-गजेडे यांनी सादर केलेल्या नामनिर्देशनात ट्रम्प यांनी जगभरात चाललेल्या संघर्षांचे निराकरण करण्याचे केलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे म्हटले आहे.

2009 च्या नोबेल शांतात पुरस्कार हा अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा बहाल झाला होता. त्य़ांना नोबेल समितीने “आंतरराष्ट्रीय मुत्सद्दीपणा आणि लोकांमधील सहकार्यांना बळकट करण्यासाठी विलक्षण प्रयत्न” केल्याच्या पार्श्वभूमीवर हा पूरस्कार दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER