राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण ; पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मित्र डोनाल्ड, लवकर बरे व्हा!’

PM Narendra Modi - Donald Trump - Melania Trump

न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प (Melania Trump) यांना देखील कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: यासंदर्भात ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की, मी आणि माझी पत्नी मेलेनियाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आम्ही तात्काळ क्वारंटाईन झालो आहोत.

डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना झाल्याची माहिती कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ट्वीट करत ट्रम्प यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया लवकर बऱ्या व्हाव्यात. त्यांना चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER