‘डोमिनोज’ पिझ्झा कंपनीचा डेटा हॅक; लाखो ग्राहकांचे क्रेडिट कार्ड डिटेल्स लीक

मुंबई :- तुम्ही ‘डोमिनोज’ कंपनीचा (Domino’s’ pizza company) पिझ्झा ऑर्डर करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध पिझ्झा ब्रँड डोमिनोज कंपनीचा डेटा पुन्हा एकदा लीक झाला आहे. सुरक्षा तज्ज्ञांच्या माहितीनुसार डार्क वेबवर १८ कोटी ऑर्डर्सचा डेटा हॅकर्सनं प्रसिद्ध केला आहे. यात हॅकरनं डोमिनोज कंपनीचा तब्बल १३ टीबीचा डेटा हॅक केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हॅकरकडे १८०,००,००० ऑर्डर्सची माहिती आहे, ज्यात युजर्सचे फोन नंबर, ई-मेल, पत्ता, पेमेंट डिटेल्स आणि क्रेडिट कार्डची माहिती आहे.

सुरक्षा तज्ज्ञ राजशेखर राजारिया यांनी ट्विटरवर याबाबतचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले आहे की, पुन्हा एकदा Dominos चा डेटा लीक झाला आहे. ते म्हणाले की, सर्च इंजिनवर १८ कोटी युजर्सचा डेटा उपलब्ध झाला आहे. यात Dominos वरून नेहमी खरेदी करणाऱ्या युजर्सचा समावेश आहे. दरम्यान, प्रत्येकाचा वैयक्तिक डेटा लीक झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

‘डोमिनोज’ इंडियानं मात्र आमच्या युजर्सचा कोणत्याही प्रकारचा डेटा लीक झाला नसल्याचा दावा केला आहे. डोमिनोज ही जगभरातील एक प्रसिद्ध फूड सर्व्हिस कंपनी आहे. जगभरातील २८५ शहरांमध्ये डोमिनोजचे हजारो आउटलेट्स आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button