घरगुती गॅस सिलिंडर सबसिडी शून्यावर

LPG Gas Subsidy

नवी दिल्ली : एप्रिलमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या (LPG) किमतीत मोठी घसरण झाल्यानंतर अनुदानित व विनाअनुदानित स्वंयपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder) किमती समान पातळीवर आल्या आहेत. गेल्या चार महिन्यांत बँक खात्यात जमा होणारी सबसिडी शून्यावर आली आहे.

त्यामुळे सामान्यांच्या बँक खात्यात काहीही अनुदान जमा झालेले नाही. याबाबत ग्राहक गॅस वितरक किंवा कंपन्यांकडे चौकशी केली असता त्यांना व्यवस्थित माहिती दिली जात नसल्याची तक्रार आहे. अनुदानित व विनाअनुदानित सिलिंडरच्या किमती समान पातळीवर आल्याने सबसिडीवर परिणाम झाला आहे. आधीच कोरोनामुळे होरपळलेला सर्वसामान्यांचा सबसिडीचा आधारही संपला आहे.

केंद्र सरकारने अनुदानित गॅसच्या बेसिक किमतीत वाढ केल्याने हा परिणाम झाला आहे. जानेवारी महिन्यात १७२ रुपये सबसिडी होती. मार्च महिना अखेरपर्यंत २४७ रुपये सबसिडी मिळत होती. आता मात्र या सबसिडीने नीचांकी पातळी गाठली आहे. दोन महिन्यांपूर्वी ही सबसिडी केवळ ४ ते १० रुपयांवर आली. दरम्यान, श्रीमंतांनी अनुदानित गॅस सिलिंडरचा वापर टाळावा या केंद्र सरकारच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता गरीब आणि श्रीमंत यांना एकाच दराने सिलिंडर मिळत आहे. वर्षाला १२ सिलिंडर अनुदानित दराने मिळतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER