कुत्र्याचे प्रसंगावधान !

Dog Video

पुणे : कुत्रा हा माणसाचा अत्यंत जवळचा मित्र आहे असे म्हणतात आणि अनेक प्रसंगाने हे सिद्ध झाले आहे. पुण्यात एका अंध माणसाची काळजी घेणाऱ्या कुत्र्याचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.

एक महिला कुत्र्यासोबत जात असलेल्या रस्त्यावर एक लाकूड आडवे पडलेले आहे. महिला आणि कुत्रा ते लाकूड ओलांडून निघून जातात. तेवढ्यात समोरून एक अंध व्यक्ती त्याच रस्त्यावरून विरुद्ध दिशेला जातो. तो अंध लाकडाला अडखळून पडू शकेल हे कुत्र्याच्या लक्षात येते. तो लगेच मागे वळतो आणि रस्त्यावर पडलेले लाकूड तोंडात धरून बाजूला करतो! हे त्याच्या मालकिणीला सुचत नाही ! मात्र, कुत्र्याला थोपटून ती त्याच्या प्रसंगावधानतेचे कौतुक करते.

पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर कुत्र्याच्या माणुसकीचा हा २३ सेकंदांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. ६ लाख ४७ हजार जणांनी तो पाहिला आहे आणि पाच हजार जणांनी रिट्विट केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER