केंद्राचे सुरक्षा रक्षक आदर पूनावालांची रेकी करते काय?; पटोलेंचा केंद्राला सवाल

Nana Patole-Adar Poonawala

मुंबई :- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सिरम इन्स्टिट्यूटचे (Serum Institute) आदर पूनावाला (Adar Poonawala) यांच्या सुरक्षेवरून केंद्रावर टीका केली. पूनावाला यांनी कोणतीही सुरक्षा मागितली नाही, तरीही केंद्राने त्यांना सुरक्षा दिली. यामागे काय दडले आहे? असा सवाल पटोले यांनी केला. केंद्राने पुरवलेले सुरक्षा रक्षक आदर पूनावालांची रेकी करत आहेत काय? असा सवालही नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

आदर पूनावाला यांनी आधी भारतात जीवाला धोका असल्याले सांगितले. केंद्राचे सुरक्षा रक्षक त्यांची रेकी करत आहेत काय?, असा सवालही त्यांनी केला. त्यांना कोणी धमकी दिली हे केंद्र सरकारने सांगावे. पूनावाला यांनी कोणालाही सुरक्षा मागितली नाही. तरीही त्यांना सुरक्षा का देण्यात आली. सुरक्षा देण्यामागचे कारण काय? हे केंद्र सरकारने जाहीर करावे, अशी मागणी नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन केली.

वॅक्सीनचे दोन दर का?
केंद्राने न मागताच पूनावाला यांना सुरक्षा पुरवली आहे. तसेच वॅक्सीनचे केंद्राने दोन दर ठरवले. यामागे टक्केवारीचे राजकारण काय आहे? केंद्र सरकार लसीकरणात अपयशी ठरल्याचा दावा पटोलेंनी केला. दरम्यान, पूनावाला यांना देशात कोणीही हात लावणार नाही. त्यांनी देशासाठी आणि देशाच्या जनतेला वाचवण्यासाठी वॅक्सिनेशनचे काम भारतात करावे, असे सांगातनाच पूनावाला यांच्यासोबत काँग्रेस आहे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी काँग्रेस घेईल, असेही पटोलेंनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button