समाजाने भीक मागत फिरायचं का? विजय वडेट्टीवारांचा संताप

- मराठा समाजासाठी जागा आरक्षित ठेवून नोकरभरती सुरू करा - मागणी

Vijay Wadettiwar

नागपूर : मराठा आरक्षणामुळे अडलेल्या नोकरभर्तीबाबत – ओबीसी (OBC) समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का? असा थेट सवाल राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar ) यांनी उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला.

कोर्टाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत मराठा समाजाच्या १२ टक्के जागा बाजूला ठेवून इतर नोकरभरती सुरू करा. ओबीसींसह (OBC) इतर मुलांचे वय वाढत चालले आहे. त्यांना वेठीस धरू नका, असे सांगताना विजय वडेट्टीवार म्हणालेत – मंत्रीपद महत्त्वाचे नाही, अन्याय किती सहन करायचा? काही मर्यादा असतात.

वडेट्टीवार नागपूर दौऱ्यावर आले होते. ते म्हणाले, मराठा समाजावर अन्याय नको, पण ओबीसींवरही अन्याय नको. नोकरीभरतीसाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरला तर ते योग्यच आहे. नोकर भरतीसाठी ओबीसी तरुणांमध्ये असंतोष वाढतो आहे. कालच्या कॅबिनेटमध्ये इतर नोकरभरती सुरू करण्याची मागणी केली आहे. एका समाजासाठी इतरांवर अन्याय नको.

माझ्याठी मंत्रिपद महत्त्वाचे नाही तर ओबीसी समाज महत्त्वाचा आहे. ओबीसीसह इतर समाजातील विद्यार्थी नोकरी मिळावी, याची वाट बघत आहेत. त्यांचं वय वाढत चाललं आहे. त्यांना न्याय कुणी द्यावा, असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

देशात जातीच्या लोकसंख्येनुसार त्या त्या वर्गासाठी आरक्षण द्यावं, ही आमची जुनीच मागणी आहे. देशात ज्या समाजाचं जेवढं प्रतिनिधित्व, त्या समाजाला तेवढे टक्के आरक्षण द्यावं, अशी गेल्या अनेक वर्षांपासून आमची मागणी आहे, असंही विजय वडेट्टीवार म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER