केंद्र सरकारला देशात अराजकता आणायची आहे का? – आदित्य ठाकरे

Aditya Thackeray.jpg

मुंबई :- काल (26जानेवारी) प्रजासत्ताक दिनी शेतक-यांचा मोर्चा आझाद मैदानावर धडकला होता. या मोर्चात महाविकास आघाडी सरकारकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) गेले होते. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले आहे. आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर नानाविध प्रश्न उपस्थित केले आहेत.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागण्यापाठी केंद्र सरकारचा काहीतरी वेगळाच डाव तर नाही ना, अशी शंका शिवसेनेचे नेते, राज्य पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारला देशात अराजकता आणायची आहे का? त्यासाठी देशात सतत आंदोलनं सुरु ठेवायची आणि काहीतरी वेगळा डाव साधायचा, असा विचार तर केंद्र सरकार करत नाही ना, असा प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, शेतकरी किंवा अन्य कोणताही घटक असो ते आंदोलनासाठी बसतात तेव्हा त्यांच्या मागण्या ऐकून घेण्याची गरज असते. त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे असते. जे शेतकरी अन्नदाता आहेत, त्यांचा संयम सुटला. तो का सुटला, या सगळ्यामागे कोणीतरी वेगळेच होते का, या सगळ्याचा विचार होणे गरजेचे आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये काय झाले? शेतकऱ्यांशी चर्चा कोण करणार? हे आंदोलन कोणी चिघळवण्याचा प्रयत्न केला का?, या प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत, सत्य बाहेर येणे गरजेचे आहे, असे आदित्य यांनी म्हटले.

तसेच, आझाद मैदानावरील शेतकरी मोर्चात शिवसेनेचा एकही मंत्री का आला नाही असा प्रश्नही त्यांना पडला असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट दिसत आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, आझाद मैदानावरील शेतकरी मोर्चात महाविकासआघाडी सरकारकडून शरद पवार गेले होते. मुख्य म्हणजे ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटायला गेले होते. मात्र, राज्यपाल मुंबईत नसल्याने ही भेट होऊ शकली नाही. असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले आहे. आदित्य ठाकरेंच्या या कोड्यातील अर्धवट विधानाचा अर्थ काय घ्यायचा हाही एक स्पित प्रश्न निर्माण होतोय. पुढे आदित्य ठाकरे यांनी या विधानाला इथेच कात्री लावून, पण दिल्लीच्या वेशीवर बसलेल्या शेतकऱ्यांशी केंद्र सरकार का बोलत नाही? हा प्रश्न पुढे केला तसेच ही अत्यंत दु:खाची बाब असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : आता कोणाचा राजीनामा मागणार, दिल्ली हिंसाचारावर संजय राऊतांचा मोदींना टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER