सत्ता आणि सिंहासनासाठी सावरकरांचा अपमान शिवसेनेला चालतो का? – राम कदम

CM Uddhav Thackeray - Ram Kadam

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) शिवसेनेच्या (Shiv Sena) दसरा मेळाव्यात भाषण करताना विरोधकांचा समाचार घेतला. मी मुख्यमंत्रिपदाचा मास्क काढून बोलतोय, असं म्हणत ठाकरेंनी भाजपावर (BJP) जोरदार हल्ला चढवला. यानंतर आता भाजप नेत्यांनी उद्घव ठाकरेंच्या भाषणावर पलटवार करण्यास सुरुवात केली आहे.“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचे पाठ स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहातून देशाला सांगितले. मात्र, आमचा प्रश्न एकच आहे, काँग्रेस नेते सावरकरांसंदर्भात अपमानकारक भाषा बोलत होते त्यावेळी शिवसेना गप्प का होती?”, असा सवाल भाजप नेते राम कदम (Ram Kadam) यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात झालेल्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला घेरले होते. त्यानंतर आता भाजप नेते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.

यावर राम कदम यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. “आज उद्धव ठाकरे हे सर्वांवर टीका करत असताना त्यांना सावरकरांचा अपमान करणारे काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), शिवसेना नेत्यांना चालतात का? सत्ता आणि सिंहासनासाठी सावरकरांचा अपमान शिवसेनेला चालतो? हा खरा प्रश्न आहे, असं म्हणत राम कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

त्याशिवाय, भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन त्यांच्यावर पलटवार केला. ‘ज्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी राम मंदिर विरोधकांसमोर गुडघे टेकले त्यांनी हिंदू धर्माबद्दल बोलू नये आणि हिंदू धर्माची चेष्टा करू नये,’ अशा शब्दांत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.

बिहारमध्ये भाजपने कोरोनाची लस मोफत देण्याची घोषणा केली आहे. बिहार राज्यात नितिशकुमार आणि भाजपचे सरकार आल्यावर जनतेला ही लस मोफत देण्यात येईल. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नितीशकुमार मदत घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील जनतेला जर मोफत लस द्यायची असेल तर महाराष्ट्र सरकारनेही पुढाकार घ्यावा. सरकारने नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) मदत घेऊन राज्यातील जनतेला कोव्हिड लस (COVID Vaccine) मोफत द्यावी, असा सल्लाही सोमय्या यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER