कंगनाला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही; मातोश्रीवरून सेना प्रवक्त्यांना सक्त आदेश

Kangana Ranaut - Uddhav Thackeray

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिने सांगितल्याप्रमाणे आज ती मुंबईत (Mumbai) येत आहे. कंगना थोड्याच वेळात मुंबईत दाखल होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘कंगनाला जास्त महत्त्व देऊ नका’ असे फर्मान मातोश्रीवरून सोडण्यात आले आहे.

मातोश्रीवरून पक्ष प्रवक्त्यांना महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत. कंगना आणि तिच्या कार्यालयावर झालेल्या कारवाईवर कुठेही बोलू नका, असे आदेश शिवसेना (Shiv Sena) नेतृत्वाकडून पक्ष प्रवक्त्यांना देण्यात आले आहेत. ‘कंगनाला जास्त महत्त्व देऊ नका. कंगनाच्या ट्विटवर, विधानांवर प्रतिक्रिया देऊ नका. त्यावर कोणतंही विधानं करू नका.’ अशा सूचना मातोश्रीवरून देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, ती मुंबईत दाखल होण्यापूर्वीच मुंबई महापालिकेने तिचे पाली येथील कार्यालयाचे बांधकाम अवैध असल्यावरून आज त्या कार्यालयावर हातोडा चालवला आहे. मनपाने कालच कंगनाचे पाली येथील कार्यालयाचे बांधकाम अवैध असल्याचे सांगत कार्यालयाबाहेर एक नोटीस चिकटवली होती.

त्या नोटीसप्रमाणे २४ तासानंतर आज मनपाने कारवाईला सुरुवात केली. या कारवाईवरून कंगना शिवसेनेवर अधिकच संतापली आहे व तिने शिवसेनेला ‘बाबर’ असे संबोधले आहे. माझे कार्यालय निव्वळ एक कार्यालय नाही. ‘मणिकर्णिका फिल्ममध्ये पहिल्या चित्रपटाची घोषणा झाली, त्याचं नाव अयोध्या होतं. त्यामुळे ही माझ्यासाठी केवळ एक इमारत नाही, तर राम मंदिर आहे. आज तिथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे.

राम मंदिर (Ram Mandir) पाडलं जातं आहे. पण बाबर, तू हे लक्षात ठेव, तिथेच पुन्हा राम मंदिर उभारलं जाईल. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम’ असं कंगनानं ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे कंगना मुंबईत दाखल झाल्यानंतर आणखी काय चित्र असेल हे पाहण्यासारखे असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER