योगींना हटवण्यासाठी मोदी-शहांची आहे का काही रणनिती?

Yogi Adityanath - PM Narendra Modi - Maharashtra Today
Yogi Adityanath - PM Narendra Modi - Maharashtra Today

गेल्या दोन आठवड्यांपासून उत्तर प्रदेशात राजकीय हलचालींना तुफान वेग आलाय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपात या बैठका पार पडत आहे. या बैठकींमागं नेमकं कारण काय? कोणत्या निर्णयासाठी या बैठका होत आहेत? असे अनेक प्रश्न यावर उपस्थीत राहत आहेत. उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या राजकीय भूकंपाची चाहूल आहे. उत्तर प्रदेशात सरकार आणि नेतृत्त्वा मोठे बदल होणार असल्याचं बोललं जातंय. तर दुसऱ्या बाजूला युपी भाजपातला मोठा गट असं काय होईल या शक्यतांना पुरता नाकरताना दिसतोय. उत्तर प्रदेशच्या राजकारणात धुमकेतूप्रमाणं एक नाव चर्चेत आलंय. त्यांच्यामुळं उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठा बदल होईल असं मानलं जातंय. नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) निकटवर्तीय, प्रशासकीय अधिकारी अरविंद कुमार शर्मा.

कोण आहेत अरविंद कुमार शर्मा (Arvind Kumar Sharma)?

या वर्षीच्या जानेवारीत शर्मा यांनी पदावरुन निवृत्ती घेण्याच्या काही दिवसांआधीच राजीनामा दिला. यानंतर ते भाजपात सामील झाले. बघता बघता त्यांना भाजपानं विधान परिषदेवर घेतलं. राजकीय वर्तुळात यानंतर चर्चा उठली की त्यांच्यामुळं उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठा बदलाव करण्याची तयारी सुरु असल्याचं बोललं जातय. राजकीय विश्लेषकांच्या मते उत्तर प्रदेशचा पुढचा मुख्यमंत्री म्हणून अरविंद शर्मा यांना संधी दिली जाऊ शकते. शिवाय त्यांच्याकडे सद्यस्थितीला उपमुख्यमंत्री पदाची किंवा गृहखात्याची महत्त्वपुर्ण जबाबदारी दिली जाऊ शकते. या परिवर्तनातून मोदींना योगी अदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या मनमानी कारभारावर रोख लावायच असल्याच स्पष्ट होतंय. परंतू पाच महिने उलटून ही त्यांच्याकडे कोणतीच जबाबदारी देण्यात आलेली नाही.

मोदींनी योगींना थेट आव्हान का देत आहेत?

उत्तर प्रदेशात राजकीय वातावरण तापलंय. मोदींच्या अरविंद शर्मांना महत्त्वपुर्ण खातं तर सोडाच त्यांना कॅबिनेट मिळणं अवघड असल्याच उत्तर प्रदेश भाजपातले वरिष्ठ नेते सांगत आहेत. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच हे पाऊल खुलेपणानं पंतप्रधान मोदींना आव्हान आहे. भाजपातल्या अनेक नेत्यांनी याची कबूली दिली आहे की काही लोकांद्वारे योगी अदित्यनाथ यांना केंद्रीय राजकारणात मोदींचा पर्याय म्हणून पुढं केलं जातंय. भाजपाशी (BJP) संबंधीत काही हिंदूत्त्ववादी संघटना पंतप्रधान असावा तर योगींसारखा अशा मोहीमा सोशल मिडीयावर चालवत असतात. त्यामुळं दोन्ही नेतृत्त्वांमध्ये वादाची परिस्थीती निर्माण झाली आहे.

संघाचं समर्थन कोणाला?

भारतातलं सर्वातम मोठं राज्य म्हणून ‘उत्तर प्रदेश’ राज्याची ओळख आहे. पुढचे पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातंय. कारण देशातले सर्वात जास्त खासदार या राज्यातून निवडून आणले जातात. उत्तर प्रदेशचं नाक हातात ठेवणाऱ्या नेत्याला पंतप्रधानपद जिंकण सहज शक्य असतं त्यामुळं हा वादाचा खटका उडतोय. युपीचा मुख्यमंत्री आपोआप देशाच्या भावी पंतप्रधानाच्या रुपात पाहिला जातो. राष्ट्रीय पक्ष असो की स्थानिक पक्ष तिथल्या मुख्यमंत्र्यांना कधी ना कधी पंतप्रधानपद भुरळ घालतंच. संघाच्या पाठिंब्यानेच ते मुख्यमंत्री बनले होते. योगी मुख्यमंत्री रहावेत म्हणून संघाने मोठे प्रयत्न केले होते. अशा परिस्थीतीत पॅरेशुटनं शर्मा यांची उत्तर प्रदेशातली उडी संघाला मान्य नसल्याच स्पष्ट आहे. उत्तर प्रदेशात योगी अदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वात भाजप त्यांचा कार्यकाळ पुर्ण करण्याच्या तयारीत आहेत. आज मुख्यमंत्री बदलण्याची शक्यता जितकी बळ घेताना दिसते आधीच्या चार वर्षात अशी परिस्थीती नव्हती.

नाराजीच कारण काय?

कोरोना संक्रमणाच्या काळात योगी सरकारच्या कार्यपद्धतीवर केंद्रीय नेृतृत्त्व नाराज होतं. सार्वजनिक स्तरावर याबद्दल कुणीच नाराजी व्यक्त केली नसली तरी केंद्रीय भाजपच्या आणि पर्यायानं मोदींची प्रतिमा यामुळं डागाळली असल्याचं स्पष्ट झालं. शिवाय यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीतही भाजप बॅकफुटवर खेळत होती. यामुळं मोदी स्वतः योगींवर नाराज असून शर्मा यांना पर्याय म्हणून ते उत्तर प्रदेशात बळ देत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button