भाजपची मक्तेदारी आहे का? अजित पवारांनी भाजपला सुनावले

Devendra Fadnavis - Ajit Pawar

मुंबई : राज्याचा २०२१-२२ वर्षाचा अर्थसंकल्प मांडला गेल्यानंतर लगेचच विरोधी पक्षांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे . हा राज्याचा अर्थसंकल्प आहे की मुंबईचा? असा सवाल करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारवर टीका केली. तसेच, अनेक योजना भाजपाच्या (BJP) काळातल्याच आहेत, अशीदेखील टीका विरोधकांनी केली. विरोधकांच्या टीकेवर अजित पवार चांगलेच भडकले आहेत.

मी काय आज अर्थसंकल्प मांडत नाहीये. २००९ ते २०१४ पर्यंत मी चार अर्थसंकल्प मांडले. जयंत पाटील, सुनील तटकरे यांनीही मांडले आहेत. अर्थसंकल्प मांडणं हे आमच्यासाठी नवीन नाही. यावेळी आमच्या सगळ्यांच्या समोर आव्हान होते . टॅक्समधून येणारा पैसा कमी झाला आहे. केंद्राकडून अजूनही ३२ हजार कोटी आलेले नाहीत. आम्ही आमच्या बाजूने सर्व घटकांना बरोबर घेऊन अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न केला आहे, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. शून्य टक्के व्याजाची घोषणा भाजपची नाही.

भाजपची काय मक्तेदारी आहे का? आम्हाला काही कळतच नाही का? त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. आम्ही काय साधुसंत नाही. जनतेला सरकारबद्दल आपलेपणाची भूमिका वाटावी, हे आमचं काम आहे. आम्ही असा कार्यक्रम देणार जो जनतेला आवडला पाहिजे. पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जनतेनं आमचा विचार केला पाहिजे. नांदेड, पुणे, ग्रामीण भागातल्या रस्त्यांचा कार्यक्रम हे मुंबई महापालिकेत आहे का? मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तिच्याकडेही लक्ष द्यायला पाहिजे , असे अजित पवार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER