कुणी क्रेडिट देता का??

Samir Saptiskar

आजवर अनेक मालिकांच्या शीर्षक गीतांनी प्रेक्षकांची मन जिंकून घेतली पण ही गाणी तयार होण्यामागे प्रचंड मेहनत आणि तेवढीच कल्पकता देखील असते. अनेक संगीतकार हे खूप कष्ट करून आपल्या गीतासाठी काम करतात आणि अनेकदा त्यांना त्यांचा कामासाठी क्रेडिट देखील दिल जात नाही. मालिकांची शीर्षक गीत तयार करणाऱ्या अनेक संगीत कारामध्ये यावरून नाराजी आहे. आपल्या कामाचं आपल्याला साधं क्रेडिट देखील दिल जात नाही हे बघून अनेक संगीतकार नाराज असतात. मराठी इंडस्ट्री मधील अश्याच एका संगीतकाराने या बद्दल सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त केली आहे.

संगीतकार समीर सप्तशिकर (Samir Saptiskar) याने त्यांचा सोशल मीडिया पोस्ट वरून या विषयावरून नाराजी व्यक्त केली. समीर म्हणतो ” प्रत्येक कलाकृती, मग ते एखादं चित्र असो किंवा गाणं, जन्माला घालणं, हे मूल जन्माला घालण्यासारखं असतं.. प्रसूतीच्या वेदना, माझी सगळी बाळं सुंदर वगैरे वगैरे आपण नेहमी कलाकारांकडून ऐकतो..

पण हल्ली कलाकार गरोदर असतानाच, त्याच्या पोटात असलेल्या पोराचा बाप (म्हणजे निर्माते किंवा प्रतिथयश चॅनल), तोंड न दाखवता दुसऱ्या बाईसोबत परस्पर संग जुळवतो आणि इथे एका अडकलेल्या आईला साधं कळवायची सुद्धा तसदी घेत नाही..

आपलं काम दुसऱ्या कलाकाराकडे गेलं ह्याचं कधीच वाईट वाटत नाही.. कारण शेवटी आम्ही सगळेच एकाच परिवाराचा भाग आहोत.. वाईट ह्याचं वाटतं की कलाकार म्हणून नाही तरी किमान माणूस म्हणून, पेमेंट नाही तरी किमान आदर तरी मिळायला हवा..

कळावे, लोभ असावा..

आणि “आम्ही दुसऱ्या कंपोजरला देतोय गाणं”

हे पुढच्या वेळी तरी

कळवावे, लोभ असावा.. “

मालिकांच्या याच श्रवणीय शीर्षक गीतावरून अनेकदा चॅनेल किंवा प्रोडक्शन हाऊस काढून असे प्रकार केले जातात. प्रत्येक गाणं तयार होण्यामागे प्रचंड मेहनत आणि आपला वेळ या दोन्ही गोष्टी इन्व्हेस्ट करून काम केलं जातं आणि मग पुढे जाऊन चॅनेल कढून संबधीत कामाबद्दल साधं क्रेडिट सुद्धा दिल जात नाही. या पोस्टवर अनेक गीतकार , संगीतकारांनी आपली मतं मांडली आहेत. समीर च्या बाबतीत हे असले प्रकार झाले नसून अनेक गीतकार , संगीतकारा सोबत हा प्रकार घडला आहे.

मराठी संगीतक्षेत्रात मालिकांच्या शीर्षक गीतांना एक वेगळंच स्थान आहे आजही अनेक मालिकांची शीर्षक गीत ही प्रेक्षकांच्या मनात आहेत किंवा त्यांचा फोन च्या रिंगटोन आहेत. कदाचित हीच एखाद्या गाण्याची प्रसिद्धी म्हणावी. एखादी मालिका सुरू होण्याआधी त्या मालिकांच्या शीर्षक गीता मधून प्रेक्षकांच लक्ष वेधून घेतलं जातं. मालिकांच शीर्षक गीत हे एवढ्या ताकदीच असत की लोक त्याला भरभरून प्रेम देतात पण खूपदा संबंधित चॅनेल आणि प्रोडक्टशन कडून त्या संगीतकाराना त्यांचा कामाचं साधं क्रेडिट देखील दिल जात नाही.

शीर्षक गीत उत्तम होण्यासाठी अनेकदा चॅनेल आणि निर्माते एकच काम ४ ते ५ संगीतकाराना देतात मग संगीतकाराना बोलावून मालिकांच्या शीर्षक गीताबद्दल सांगितलं जातं आणि त्यानंतर गीतकार , संगीतकार आपले पैसे घालून गाणं तयार करतात आणि दुसऱ्या लोकांना हेच काम दिल असल्या कारणाने कधीकधी हे गाणं टिव्हीवर झळकत अश्या परिस्थिती एकच काम अनेक लोकांना दिल तर जातात पण संबधीत व्यक्ती गीतकाराना आणि संगीतकाराना कळवत देखील नाही.

अनेकदा संगीत कारांच काम वापरून त्यांना क्रेडिट देखील दिल जात नाही. संगीत कारा बरोबर गीत काराना देखील अश्या परिस्थितीला अनेकदा सामोरं जावं लागलंय आता इंडस्ट्रीत लोक या बाबतीत उघडपणे बोलतात तर काही बोलत सुद्धा नाहीत.

ह्या बातम्या पण वाचा 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER