अजित पवारांना कायदा कळतो का? निलेश राणेंचा सवाल

Nilesh Rane - Ajit Pawar

मुबई :  मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयानं आज महत्त्वाचा निकाल दिला. राज्य सरकारनं तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत मराठा समाजाला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने जे नाकारले, त्याची भरपाई शक्य त्या सर्व मार्गांनी करून देण्याचा राज्य शासनाचा पुरजोर प्रयत्न राहील. मराठा बांधवांना न्याय आणि त्यांचा हक्क देण्यासाठी राज्य सरकारला जे शक्य आहे ते सर्व केले जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहे. अजित पवारांच्या या विधानावरून माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी सडकून टीका केली.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे फेल झालं आहे. सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकलं नाही ह्याचं खापर पण केंद्र सरकारवर टाका. फार मोठ्या प्रमाणावर मराठा तरुणांचं नुकसान झालेलं आहे. त्यांचं  भवितव्य अंधारात ढकलण्याचं  काम ठाकरे सरकारनं  केलं, असं म्हणत निलेश राणे यांनी राज्य सरकारचा निषेध नोंदवला तसेच अगोदरच्या नियुक्त्या अजून केल्या नाहीत आणि म्हणे सर्वतोपरी भरपाई करणार. आजपर्यंत कशाची वाट बघत होते? मराठा आरक्षणाचे सर्व मुद्दे राज्यातच मिळाले असते तर हा विषय एवढा ताणला नसता. अजित पवारांना कायदा कळतो का? एवढा पुळका समाजाचा होता तर सुप्रीम कोर्टाच्या तारखेपर्यंत का थांबलात? असा सवालही त्यांनी अजित पवार यांना विचारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button