डॉक्टरांची टिंगल : बाबा रामदेव यांच्यावर कारवाई करा; IMA चे उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

Tirath Singh Rawat - IMA - Ramdev Baba

डेहराडून :- अॅलोपॅथीवर टीका केल्याने गेल्या आठवड्यात वादात अडकलेले बाबा रामदेव यांनी आता सरसकट डॉक्टरांची टिंगल उडवली. यासाठी त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (Indian Medical Association) उत्तरांचल शाखेने मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) यांना पत्र लिहून केली.

घटना
रामदेव बाबा (Ramdev Baba) यांचा योगा करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात एक जण म्हणतो, मला डॉक्टर व्हायचे आहे. यावर बाबा रामदेव म्हणतात – डॉक्टर बनायचे आहे. एक हजार डॉक्टर तर आताच कोरोनाचे दोन डोस घेतल्यानंतर दगावले… किती? एक हजार! कालचीच बातमी आहे. स्वत:ला वाचवू शकत नाही, ती कसली डॉक्टरी? डॉक्टर व्हायचेच असेल तर स्वामी रामदेवसारखे व्हा. माझ्याकडे कोणतीही डिग्री नाही. तरीही मी सर्वच विषयांचा डॉक्टर आहे. विदाऊट एनी डिग्री. विथ डिव्हिनिटी. विथ डिग्निटी आय अॅम ए डॉक्टर!

आयएमएने पत्रात म्हटले आहे की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत १५३ डॉक्टरांना आपला प्राण गमवावा लागला. दुसऱ्या लाटेत ४५२ डॉक्टरांचा मृत्यू झाला. अशात बाबा रामदेव यांचं विधान योग्य नाही. या विधानासाठी त्यांच्यावर कारवाई करा.

ही बातमी पण वाचा : रामदेव बाबांनी पुन्हा एलोपॅथी उपचारावर उपस्थित केले प्रश्नचिन्ह

बाबा रामदेव यांनी या वक्तव्याने डॉक्टरांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे निष्ठेने काम करणाऱ्या डॉक्टरांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे, असे पत्रात म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनीही बाबा रामदेव यांना पत्र लिहून त्यांच्याकडून खुलासा मागितला आहे. याकडेही या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे. रामदेव यांच्यावर कठोर कारवाई होईल, अशी आम्हाला आशा आहे, असे आयएमएने म्हटले आहे.

अॅलोपॅथीवर टीका
यापूर्वी बाबा रामदेव यांनी व्हॉटस अॅपवर मेसेज करून अॅलोपॅथीवर टीका केली होती. आश्चर्यकारक तमाशा आहे. अॅलोपॅथी मूर्खपणाचं आणि दिवाळखोर विज्ञान आहे. आधी रेमडेसिवीर फेल ठरलं, नंतर अँटिबायोटिक्स फेल झालं, नंतर स्टेरॉईड फेल झालं, प्लाझ्मा थेरपीवरही बंदी घालण्यात आली, असं ते म्हणाले होते.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button