‘कोव्हिड योद्धांची’ ओळख, मात्र विमा नाकारला, डॉक्टरांनी राज ठाकरेंसमोर मांडली व्यथा

Raj Thackeray - Doctors

मुंबई : कोरोनाच्या (Corona) संकटकाळात ‘कोव्हिड योद्धे’ (COVID Warriors) म्हणून अग्रणी भूमिका बजावणाऱ्या डॉक्टरांना विमा नाकारल्याचा धक्कादायक आरोप होत आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेत मदतीची मागणी केली.

कोरोना काळात अडीच लाखांपेक्षा जास्त डॉक्टरांनी सेवा दिली. मात्र त्यांना सरकारने विमा कवच नाकारल्याचा दावा डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरे यांच्याकडे केला. भेट घेतली. कोरोना काळात सरकारने डॉक्टरांना सक्तीने क्लिनिक उघडण्यास भाग पाडले, मात्र कोरोनाने बळी गेलेल्या डॉक्टरांचा विमा मात्र नाकारला जात असल्याने या डॉक्टरांनी संताप व्यक्त केला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत १४७ डॉक्टरांचा या काळात दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र सरकार याबाबत जबाबदारी घेत नसल्याने डॉक्टरांनी राज ठाकरेंकडे साकडे घातले आहे.

"क्लिनिक उघडण्याची सक्ती, मात्र विमा नाकारला" डॉक्टरांचे शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER