डॉक्टरांना पुन्हा मारहाण

नायर रुग्णालयातील घटना, गुन्हा दाखल

Doctors Assault

मुंबई :- मुंबईत डॉक्टरना मारहाणीच्या घटना ताज्या असतानाच नायर रुग्णालयातील दोन डॉक्टरसह सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी रात्री उशिराने गुन्हा आग्रीपाड़ा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकिशोर प्रेमाशंकर दीक्षित वय 50 वर्षे रा ठी घाटकोपर मुंबई हे एक महिन्यापासून hiv, tb, pneumonia आजारावर नायर हॉस्पिटल येथे उपचार घेत होते, उपचारादरम्यान त्यांचे आज रोजी सायंकाली ७ वाजता वा निधन झाले, सदर इसमाच्या तोंडात औषडोपंचारासाठी नळी घातलेली होती सदरची नळी ही कोणी काढली असे नातेवाईकांना विचारले असता, डॉक्टर व नातेवाईकांमध्ये वाद झाला त्यातील इसम नामे गजेंद्र कुमार मिश्रीलाल जैन वय 39 वर्षे रा ठी रम न 302, house न 916, सेक्टर 19, कोपर खैराने, नवी मुंबई यांनी व दोन महिला यांनी डॉक्टर दीपाली शामसुंदर पाटील, डॉक्टर गौरव राजू गुंजन, सुरक्षा रक्षक भूषण अशोक कराळे यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. त्यानुसार मारहाण करणणा-याविरुद्ध रात्री १०. ३० च्या सुमारास आग्रीपाडा पोलीस ठाणे येथे गु र क्र 213/19 कलम 353, 332, 504, 34 भा द वि सह 4, 6 महाराष्ट्र वैधकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय संस्था, हिंसक कृत्य, मालमत्तेची हानी याना प्रतिबंध कायदा अनवये त्याच्याविरुद्ध गुन्हा गुन्हा दाखल केल्याची माहिती आग्रीपाड़ा पोलिसांनी दिली.