डॉक्टर म्हणजे पृथ्वीवरील देवदूत आहेत : योगगुरू बाबा रामदेव

Ramdev Baba

नवी दिल्ली :- काही दिवसाआधी योगगुरू बाबा रामदेव यांनी अ‍ॅलिओपॅथीबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने त्यांना नोटीसही बजावली. मात्र, आता अ‍ॅलिओपॅथीवर टीका करणारे बाबा रामदेव (Baba Ramdev) अखेर कोरोनाची लस घेणार आहेत. त्यांनी यू टर्न घेत डॉक्टरांची स्तुती केली आहे. डॉक्टर हे पृथ्वीवरील दूत आहेत, असे ते म्हणाले आहे.

कोरोना लसीवरून बाबा रामदेव यांनी अ‍ॅलिओपॅथी डॉक्टरांवर टीका केली होती. तसेच लस घेण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. आता केंद्र सरकारने देशभरात मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. मात्र, आता या घोषणेचे बाबा रामदेव यांनी स्वागत केले आहे. ऐतिहासिक निर्णय असे सांगत सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.

“लसीचे दोन्ही डोस घ्या. योग आणि आयुर्वेदामुळे (Ayurveda) तुम्हाला दुपटीने ताकद मिळेल. हे दोन्ही संरक्षण कवच म्हणून काम करेल. यामुळे एकही व्यक्ती कोरोनामुळे दगावणार नाही. मी सुद्धा लवकरच लस घेणार आहे.” असे बाबा रामदेव यांनी सांगितले.

आमची कोणासोबतही दुश्मनी नाही. डॉक्टर म्हणजे पृथ्वीवरील देवदूत आहेत. केवळ औषधांच्या नावावर जनतेच्या होणाऱ्या शोषणाविरोधात आवाज उठवत होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button