कोरोनातून बरे झाल्यानंतरही होऊ शकतो पुन्हा संसर्ग; मुंबईच्या डॉक्टरच ठरल्या पहिल्या रुग्ण

मुंबई : कोरोना संसर्गाबाबत (Corona Virus) पुन्हा एक नवीन बाब समोर आली आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतरही तुम्हाला पुन्हा कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. हॉंगकॉंगमधील डॉक्टरांनी हा दावा केला आहे की, एकदा कोरोना झाला आणि त्यातून तुम्ही बरे झाले असलात तरी पुन्हा कोरोनाचा संसर्ग होणारच नाही असे म्हणता येणार नाही. याचे पहिलेच उदाहरण म्हणजे मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये (Sion Hospital) काम करणा-या डॉक्टरांना उपचारानंतर कोरोनाची चाचणी निगेटिव्ह असल्याची खात्री पटल्याच्या दोन महिन्यांनंतर पुन्हा त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

पुन्हा संसर्ग होण्याची मुंबईतील ही पहिलीच घटना आहे. परंतु दिलासादायक बाब म्हणजे पुन्हा संसर्गातूनही डॉक्टर कोरोनातून बरे झाले आहेत.

सायन हॉस्पिटलचे डीन डॉ. मोहन जोशी यांनी हे प्रकरण हाताळले व चिंताजनक नसल्याची खात्री पटवून दिली. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेन्ट डॉक्टरच्या (एमएआरडी) (MARD) प्रतिनिधीने सांगितले की, सायन हॉस्पिटलच्या अनेस्थेशिया विभागातील एका महिला डॉक्टरला पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाला. “दोन आठवड्यांपूर्वीच हे प्रकरण उघडकीस आले. तिची पुन्हा एकदा सकारात्मक चाचणी झाली आणि तिला अंधेरीच्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले.” असे सांगण्यात आले.

पुन्हा संसर्ग झालेल्या डॉक्टर दोन महिन्यांपूर्वीच कोरोनातून ब-या झाल्या होत्या. त्यांच्यावर पूर्ण उपचार झाले होते. मारडच्या प्रतिनिधीने सांगितले की, काही दिवसांपूर्वी त्यांना पुन्हा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले. उपचारानंतर आता त्यांची दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. “त्यांना दोन्ही वेळेस गंभीर आजार नव्हता. आता त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली असून काही दिवस त्यांना अलगीकरणात ठेवण्यात येईल.” असे डॉक्टर म्हणाले.

कोविड पुन्हा संसर्ग आणि रोग प्रतिकारशक्ती हा एक चर्चेचा विषय आहे; कोरोना व्हायरस हा आजार इतर संसर्गाच्या अगदी विरुद्ध असल्याचे सिद्ध झाले आहे. सध्या बर्‍याच शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, प्रभावित लोक केवळ काही महिन्यांसाठी रोगप्रतिकारशक्ती विकसित करू शकतात.

दरम्यान, ३१ ऑगस्ट रोजी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ जेनेटिक्स सोसायटीतर्फे एक वेबिनार आयोजित करण्यात आला होता. या वेबिनारमध्ये कोविड लस उपक्रमाशी संबंधित सीएमसी वेल्लोरचे डॉ. गगनदीप कांग यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, मुंबईत पुन्हा कोरोना चाचण्या करण्यावर चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप यावर कोणतेही ठाम मत नाही. महानगरपालिकेने आतापर्यंत कोणत्याही पुनर्निर्देशनास नकार दिला आहे, असे एका अधिका-याने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER