औषधांचा ओव्हरडीस घेत डॉक्टरने संपविले आयुष्य…

मुंबई : औषधाचा ओव्हरडीस घेत डॉक्टर महिलेने आयुष्य संपविल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली. योगिता बीजलानी असे डॉक्टर महिलेचे नाव असून, तिचे पंजाब महाराष्ट्र बँकेत एक कोटी रुपये होते. त्यामुळे आत्महत्येचे नेमके कारण काय आहे? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

ही बातमी पण वाचा : वर्सोव्यात डॉक्टरची आत्महत्या!

वर्सोवा परिसरात आई वडिलांसोबत त्या राहण्यास होत्या. पहिल्या पतीकडून घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी दुसरा विवाह केला. सध्या त्या पतीसोबत अमेरिकेत वास्तव्यास होत्या. काही दिवसांपूर्वी अठरा महिन्याच्या बाळाला घेऊन त्या भारतात आई वडिलांना भेटण्यासाठी आल्या होत्या. मंगळवारी त्यांनी औषधांचा ओव्हरडोस घेत आत्महत्या केली. ही बाब कुटुंबियांना समजताच त्यांना धक्का बसला. याप्रकरणी अपघाती मृत्युची नोंद वसोर्वा पोलिसांनी केली.

यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न..

गेल्या काही महिन्यांपासून त्या मानसिक तणावात होत्या. यापूर्वी त्यांनी अमेरिकेत असतानाही आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे त्यांच्या घरच्यांनी पोलिसांना सांगितले आहे.

आत्महत्येचे मागचे गूढ कायम…
बीजलानी यांचे पंजाब महाराष्ट्र बँकेत एककोटीहुन अधीक रुपये होते. या घोटाळ्याच्या तणावातून त्यांनी हे पाऊल उचलले का? या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत.