आदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का? शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल

Aditya Thackeray-Devendra fadnavis-Sanjay Raut

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीसह शिवसेनेचे (Shivsena) नेतेही नाराज झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची भाजपने बदनामी केली. त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.

अशा भाजपसोबत परत कशाला जायचे, असा सवाल सेनेच्या नेत्यांनी राऊतांना केला आहे. दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, संजय राऊत यांच्या या भूमिकेमुळे शिवसेनेचे काही नेते नाराज झाले आहेत. आदित्य ठाकरे यांच्यासाठी भाजपवर टीका करणारे संजय राऊत यांना याचीसुद्धा जाणीव राहिली नाही का? अशी टीकाच काही मंत्र्यांनी केली.

महाविकास आघाडीत राहिल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जी मतं आपल्याला मिळत नाहीत, ती जर मिळत असतील तर त्यात शिवसेनेचाच फायदा नाही का, असा सवाल सेनेच्या ज्येष्ठ नेत्याने उपस्थितीत केला. शिवसेनेचा पाच वर्षे सतत अपमान केला, आदित्यला अडचणीत आणले, एकनाथ शिंदे यांना कल्याण-डोंबिवलीच्या निवडणुकीत स्टेजवर भाजपमुळे रडावे लागले, अशा भाजपसोबत जायचे कशाला, असे प्रश्नही शिवसेना नेते करत आहेत.

ही बातमी पण वाचा :मोदींच्या झंझावातानेच ‘एनडीए'(NDA) नष्ट झाली, शिवसेनेची मोदींवर विखारी टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER