स्वतः घरी बसलात यासाठी लोकांनाही घरी बसवाल का? मनसेचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न

Sandeep-Deshpande-Uddhav-Thackerey

मुंबई : हायकोर्टाने कान टोचले तरी यांना बुद्धी सुचत नाही. स्वतः घरी बसलात यासाठी लोकांनाही घरी बसवाल का? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना केला आहे. हे सरकार केवळ फेसबुकवर (Facebook) घोषणा करणारं आहे, प्रत्यक्षात मात्र काहीच केलं जात नाही, अशी टीकाही देशपांडेंनी केली.

अनलॉक-५ अंतर्गत तुम्ही रेस्टॉरंट-बार सुरु करत आहात. एक-एक आस्थापना सुरु करण्यास परवानगी देत आहेत. पण त्यासाठी लोकांनी कामावर कसं जायचं? त्या प्रश्नाचं उत्तर सरकार देत नाही’ संदीप देशपांडे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी याबाबत बातचित केली.

‘तुम्ही नुसती घोषणा करता, १५ ऑक्टोबरपासून लोकल सेवा सुरु करण्यासाठी विचाराधीन आहोत. त्यासाठी विचार करावा लागतो. विचार करण्याचं धाडस सरकरमध्ये नाही’ अशी टीकाही संदीप देशपांडेंनी केली. १५ ऑक्टोबरपासून लोकल सुरु करण्याचा विचार असल्याचं मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. मात्र रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी महाराष्ट्र सरकारतर्फे अद्याप असा कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावरून सरकारच्या कथनी आणि करणीमध्ये मोठा फरक असल्याचे देशपांडे म्हणाले. सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल सुरु करण्याचा विचार करा, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता.

१०-१५ दिवस झाले आम्ही सतत मागणी करत आहोत, बँक रोज कर्जासाठी तगादा लावत आहे, लोक कामावर गेले नाहीत, तर कसे भरणार हे पैसे? असा सवाल करत ज्या कॅटेगरी सुरु केल्या, त्या ठिकाणी काम करणाऱ्यांना तरी परवानगी द्या. लोक आता याचं उत्तर देतील. आंदोलन करुन जर सरकारला अक्कल येत नसेल आणि सरकारला डोकं नसेल तर आपण तरी काय करणार? अशी मिस्कील टीकाही त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER