ईडीच्या भीतीमुळे आम्हाला ‘टार्गेट’ करता का? यशोमती ठाकूर यांचा शिवसेनेला टोमणा

Yashomati Thakur & Shivsena

अमरावती : औरंगाबादच्या ‘संभाजीनगर’ नामांतरावरून महाविकास आघाडीमध्ये वाद सुरू आहेत. शिवसेनेचे मुखपत्र सामनाने आज याबाबत काँग्रेसवर टीका केली. तिला उत्तर देताना काँग्रेस नेत्या, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी शिवसेनेला – ईडीच्या भीतीमुळे आम्हाला ‘टार्गेट’ करता का? असा जिव्हारी लागणार टोमणा मारला.

यशोमती ठाकूर म्हणाल्या की, ‘कॉमन मिनिमम पोग्राम’वर आम्ही चालत आहोत. मागील पाच वर्षांपूर्वी भाजपा-शिवसेनेची युती होती. तेव्हा औरंगाबादचा विषय का निपटवला नाही?

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून वाद पेटला आहे. शिवसेनेसाठी हा मुद्दा प्रतिष्ठेचा आहे. संभाजीनगर हे नाव शिवसेनेनेच औरंगाबादला दिले असून या नामांतरासाठी शिवसेना गेल्या कित्येक वर्षांपासून प्रयत्नशील आहे. मात्र, आता सत्तेत आल्यानंतरही शिवसेनेला हे नामांतरण करणे अवघड जाते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER