शरद पवारांना सरकार सत्तेत आणल्याचा पश्चात्ताप होतोय का ? ; चंद्रकांत पाटलांचा सवाल

Sharad Pawar & Chandrakant Patil

मुंबई : राज्यपालांनी पाठविलेल्या कार्य अहवालावर शरद पवार (Sharad Pawar) यांनी पाठविलेल्या अभिप्रायाचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. पुस्तकात एखाद-दुसरा प्रसंग वगळता शपथविधी स्वागत समारंभ, दीक्षांत समारंभ सोहळे, उच्चपदस्थ गाठीभेटी, सांस्कृतिक कार्यक्रम छायाचित्रे  आहेत, असे शरद पवार यांनी पत्रात म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे.

हा अहवाल पाहिला तर त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या २८ नोव्हेंबरच्या तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ३० डिसेंबरच्या शपथविधीची छायाचित्रे आहेत. शरद पवार यांना ही छायाचित्रे खटकतात की, त्यांना आता सध्याच्या परिस्थितीमुळे असे सरकार सत्तेवर आणल्याचा पश्चात्ताप होतो का? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil) यांनी उपस्थित केला आहे .

घटनात्मक पदावर असलो तरीही आपण जनतेला उत्तरदायी आहोत, या उदात्त भावनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या वर्षभराच्या कामाचा अहवाल प्रसिद्ध करून लोकप्रतिनिधींकडे पाठविला असता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी त्यावर कुत्सितपणे उत्तर पाठविले आहे. जाणत्या राजाला असा दृष्टिकोन शोभत नाही, असा टोलाही पाटील यांनी पवारांना लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER