अल्प व्याजदरात लाखो रुपये शेतकऱ्यांना देणारी ही योजना तुम्हाला माहीतये का?

कोट्यावधी शेतकरी आजघडीला किसान क्रेडिट कार्डचा लाभ घेत आहेत. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या योजनेसाठी पात्र असणाऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड काढणं अधिक सोप्प झालंय. या कार्डच्या माध्यामातून खाद्य, बी-बीयाणे इत्यादी शेतीविषयक खर्चांसाठी सुलभ पद्धतीने कर्जाची उपलब्धी केली जाते.

२.५ कोटी शेतकऱ्यांना मिळेल किसान क्रेडिट कार्ड
सरकारने पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या अडीच कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्याचा निर्णय घेतलाय. क्रेडिट कार्ड घेणाऱ्या शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज मिळेल. या वित्त वर्षात सरकार शेतकऱ्यांना २ लाख कोटींचे कर्ज वाटणार असल्याची घोषणा केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सितारमण यांनी केलीय.

किसना क्रेडिट कार्ड म्हणजे नेमकं आहे तरी काय?
किसान क्रडीट कार्ड म्हणजे केसीसी योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी आहे. शेतकऱ्यांना वेळेत पैसै उपलब्ध होऊन शेती विषयक कामं पैशांच्या कमतरतेमुळं अडून राहून नयेत म्हणून या योजनेची निर्मिती करण्यात आली. विशेष म्हणजे स्वतःची जमिन असणाऱ्या शेतकऱ्यासोबतंच इतरांची जमीन भाडेतत्त्वावर करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा मिळू शकतो.

तसेच २०१८-१९ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पशुपालन (शेळीपालन, मेंढीपालन, कुकुटपालन इ.) आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचाही यात सामावेश करण्यात आला आहे.

घर बसल्या करता येते नोंदणी
२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्याचा निर्धार केलेल्या मोदी सरकारने गेल्या सहा वर्षात अनेक योजना प्रत्यक्षात उतरवल्यात. यापैकीच एक पीएम किसान योजना आहे. या योजने अंतर्गत सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रूपये देते. हा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो. २०००-२००० च्या हप्त्यात हा पैसा शेतकऱ्यांकडे जमा होतो. या योजनेचा लाभ ९.१३ कोटी शेतकरी घेताहेत. यासंबंधी महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांना मिळावी म्हणून केंद्र सरकारकडून वेबसाईचही लॉंच करण्यात आलीये. www.pmkisan.gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर किसान क्रेडिट कार्ड फॉर्म डाऊनलोड करता येतो. त्यानंतर प्रिंट करुन त्यात योग्य ती माहिती भरुन जवळच्याच बँकेत जमा करायचा आहे. कार्ड तयार झाल्यानंतर बँक संबंधित शेतकऱ्याशी संपर्क साधून ते कार्ड पोस्टाने शेतकऱ्याच्या पत्त्यावर पाठवते.

दोन लाखांपर्यंतचा मिळतोय वीम कव्हर
प्रतिवर्ष १२ रुपये भरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत दोन लाखांचे वीमा संरक्षण देण्यात येते. यासोबतच ३३० रुपये वार्षिक प्रमिअमवर प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेच्या माध्यामातूनही २ लाखांपर्यंतचे वीमा संरक्षण मिळतं.

घरगूती खर्चासाठी १० टक्के रक्कम येईल वापरता
लॉकडाऊनच्या काळात पैशाची उपलब्धता नसल्यामुळं शेतकऱ्यांचे हाल होऊ नयेत म्हणून एकूण रकमेच्या दहा टक्के रक्कम घरगुती खर्चासाठी वापरण्याची मुभा किसान कार्डसाठी रिझर्व बँकेने दिलीये.

किती मिळेल कर्ज?
केसीसीच्या अंतर्गत शेतकऱ्याला किती कर्ज मिळले हे त्याचे उत्पन्न किती? यावरुन ठरवलं जातं. त्या जमिनीवर लागवडी खालील क्षेत्राचा विचार करण्यात येतो.

केसीसी अंतर्गत ३ लाखापर्यंतचं कर्ज शेतकऱ्याला देण्याची सोय आहे. पण जर तुमची गरज १लाख ६० हजारां इतकr असेल तर हे कर्ज विना तारण मिळतं. त्यापुढच्या रकमेसाठी तारण ठेवणं गरजेच आहे. शेतमालाच्या विक्रीतून शेतकरी या कर्जाची फेड करतील अशी आशा असते. यातून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे १ लाखांपर्यंतच कर्ज बिगर व्याज वापरता येतं.