
या अभिनेत्रीने आपल्या अभिनय आणि सौंदर्याने 80-90 च्या दशकात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली होती. सुभाष घई यांनी जॅकी श्रॉफची (Jackie Shroff) नायिका म्हणून मनोज कुमारच्या ‘पेंटर बाबू’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर आलेल्या मीनाक्षीला (Meenakshi) त्यांच्या ‘हीरो’मध्ये घेतले. ज्याप्रमाणे हीरो म्हणून जॅकी श्रॉफ प्रचंड लोकप्रिय झाला त्याचप्रमाणे मीनाक्षीही या चित्रपटामुळे प्रचंड लोकप्रिय झाली आणि तिच्याकडे निर्मात्यांच्या नजरा वळल्या. 90 च्या दशकात अगदी अमिताभ बच्चनपासून ते ऋषी कपूर, सनी देओलपर्यंत मीनाक्षीने त्यांच्या नायिकेच्या भूमिका केल्या. राज कुमार संतोषी यांनी दिग्दर्शित केलेला ‘दामिनी’ हा तर मीनाक्षीच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट. मात्र नव्या नायिकांनी बॉलिवुडमध्ये एंट्री केली आणि मीनाक्षी इंडस्ट्रीबाहेर फेकली गेली. काही जुन्या नायिका क्वचित कुठे तरी दिसत असतात पण मीनाक्षी कधीही दिसली नव्हती.
मात्र आता मीनाक्षीनेच स्वतःचे नवीन फोटो टाकून पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. इंडस्ट्रीतून बाहेर गेल्यानंतर मीनाक्षीने लग्न केले आणि पति मुलांसोबत अमेरिकेतील टेक्सास येथे राहू लागली आहे. मीनाक्षीने नुकतेच प्रथमच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिने केलेल्या नवीन फोटोसेशनचे फोटो टाकले आहेत. सोबतच तिचा 90 च्या दशकातील लुकचा फोटोही टाकला आहे. दोन्ही फोटोंची तुलना करताना मीनाक्षीत झालेला बदल स्पष्टपणे दिसून येत आहे.
इंस्टाग्रामवर टाकलेल्या फोटोमध्ये मीनाक्षीने तेव्हा आणि आता असा लुक दाखवला आहे. यापैकी एक फोटो जुना तर एक फोटो नवीन आहे. दोन्ही फोटोंमध्ये मीनाक्षीने सारखीच पोज दिलेली आहे. मात्र आता 57 वर्षाच्या झालेल्या मीनाक्षीच्या चेहऱ्यात खूपच बदल झालेला दिसत आहे. लॉकडाउनमध्येही मीनाक्षीने घरात जेवण बनवत असतानाचा व्हीडियो सोशल मीडियावर शेअर केला होता.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला