राणी जिंदा कौर यांच्या अतुल्य सहासाची कहाणी तुम्हाला माहितीये का?

Maharashtra Today

भारताचा इतिहास हा त्याग आणि बलिदानाच्या शाईनं लिहला गेलाय. भारताच्या इतिहासात आढळणारी पात्रं आजही जगाच्या पाठीवर दिसत नाहीत. म्हणून जगभरातल्या लोकांना भारतीय इतिहासाबद्दल नेहमी कुतुहल राहिलेलं आहे. अनेकांनी जीवपणाला लावून मातृभूमीचं रक्षण केलंय. त्यापैकीच एक होत्या ‘राणी जिंदा कौर.'(Rani Zinda Kaur)

एक अशी आई जिला राज्याच्या रक्षणासाठी स्वतःच्या तान्ह्या बाळापासून दुर व्हावं लागलं. त्या चिमुरड्याला त्याच्या आईशिवाय इतर कोणताच आधार नव्हता. हे माहित असताना सुद्धा या बलाढ्य राणीनं इंग्रजांविरुद्ध तलवार उचलली. हा लढा देणारी रणरागिनी पंजाबचे महाराजा ‘रणजित सिंह’ यांची पत्नी होती. पतिच्या मृत्यूनंतर त्या खचून गेल्या नाहीत. उलट इंग्रजांविरुद्ध त्यांनी निखराची लढाई दिली.

राणी जिंदा कौर यांच्या युद्ध कौशल्यापुढं इंग्रजांनी गुडघे टेकले होते. त्यांच्या युद्धतंत्रापुढं अनेकदा इंग्रजांच्या बंदुका आणि तोफा निकाम्या झाल्या होत्या.

पतिच्या मृत्यूनंतर शासनाचा घेतला ताबा

राणी जिंदा कौर यांचा जन्म १८१७ला झाला. त्यांचे वडील सरदार मन्नासिंह होते. त्यांनी महाराजा रणजित सिंहांना विनंती केली होती की त्यांच्या मुलीला पत्नी म्हणून महाराजांनी स्वीकारावं. महाराजा रणजिंत सिंहांनी अनेक लग्न केली. परंतु वारसदार म्हणून त्यांना ‘खडकसिंह’ या एकाच मुलाची प्राप्ती झाली. त्यांची तब्येत वारंवार खराब व्हायची. अशातच महाराज रणजित सिंह यांनी १८३५ साली राणी जिंदा कौर यांच्याशी विवाह केला.

महाराजा रणजित सिंह यांच्या सर्वच पत्नींमध्ये राणी जिंदा कौर सुंदर होत्या. लग्नानंतर त्यांना एक मुलगा झाला त्याचं नाव होतं ‘दिलीप सिंह’. महाराजा रणजित सिंहांना दिलीप सिंहांमध्येच उत्तराधिकारी दिसायचा. १८३९ साली महाराजा रणजित सिंहांचा मृत्यू झाला. पंजाबमध्ये अराजकतेची परिस्थीती निर्माण झाली. त्यांना मुलगा दिलीप सिंह पाच वर्षाचा असताना १९४३ साली त्याला गादीवर बसवलं गेलं. दिलीपसिंह नाबालिक असल्यामुळं राणी जिंदा कौर ह्याच त्याच्या संरक्षक बनल्या.

यानंतर पंजाबच्या कुशल शासकांपैकी एक म्हणून त्यांनी ओळख कमावली. जनता त्यांच्या कामावर खुश होती. त्यांनी अनेक प्रजाहिताचे निर्णय घेतले.

राणी जिंदा कौर यांनी वजीर ‘राजा लालासिंह’ यांच्या सोबत मिळून इंग्रजांविरुद्ध लढा दिला. सैन्याला पुन्हा आधीसारखं सामर्थ्यवान बनवण्याचा त्यांनी वीडा उचलला. महाराजा रणजित सिंहांच्या सैन्याला पुन्हा उभारी देण्याच काम त्यांनी केलं.

इंग्रजांच्या मनात दहशत निर्माण केली

इंग्रजांविरुद्ध पहिलं युद्ध १८४५ साली सुरु झालं. स्वतःच्याच सैन्यातील फुटीर अधिकाऱ्यांमुळं त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. परंतु इंग्रजांना मिळालेला विजय इतका सहज सोप्पा नव्हता. त्यांनी सैन्याचा वापर अशा रणनिती आखुन केला की इंग्रजी सैन्याची अधुनिक हत्यार काहीच उपयोगात येत नव्हती. पुढच्याच क्षणी इंग्रज सैन्य युद्धात पराजीत होईल अशी परिस्थीती त्यांनी निर्माण केली होती.

पहिल्या युद्धात तह झाला. या करारानूसार त्या महाराजा दिलीप सिंहांच्या संरक्षिका राहिल्या. वरकरणी दिसत नसलं तरी त्या इंग्रजांविरुद्ध मोठं षडयंत्र रचत होत्या. त्यांच्या हलचाली इंग्रजांना संशयास्पद वाटत होत्या. इंग्रजांच्या मनात इतकी दहशत होती की त्यांनी राणी जिंदा कौर यांच्याविरुद्ध महाभियोग लागू केला. त्यांना १८४८ साली लाहोर सोडावं लागलं. दुसऱ्या शिख युद्धाला सुरुवात झाली. राणींच्या उपस्थीतीमुळं पंजाब कमजोर पडलं. पंजाबचा बराच प्रांत इंग्रजांनी बळकावला.

चुनार किल्ल्यात त्यांना नजर बंद करण्यात आलं. त्यांच्या खर्चासाठी रक्कमही दिली जात नव्हती. पंजाबसंबंधित कोणत्याच प्रकरणात इंग्रजांच्या मर्जीशिवाय हस्तक्षेप करु नये, अशी सुचना त्यांना करण्यात आली. पंजाब बद्दल बोलताना लॉर्ड डलहौसी म्हणाला होता, “इतर सर्व सैन्यांच्या बदल्यात पंजाब सर्वाधिक महत्त्वाचं आहे.”

मोलकरणीसारखा वेश करुन त्या नजरकैद भेदून बाहेर पडल्या. त्यांनी तडक नेपाळ गाठलं. यानंतर १८५७ च्या उठावात त्यांनी काश्मिरच्या महाराजासोबत स्वतः युद्धात सहभाग घेतला. दरम्यान त्यांच्या मुलाला इंग्रजांनी लंडनमध्ये ठेवलं. राणी व्हिक्टोरीयाच्या दरबारात बालक दिपक सिंह मोठे झाले.

अनेक वर्षानंतर मुलाची झाली भेट

दिलीप सिहांनी लंडनमध्ये असताना ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. त्यांना ‘ब्लॅक प्रिन्स’ यानावानं ओळखलं जात होतं. मुलाच्या भेटीसाठी जिंदा कौर यांनी अनेक प्रयत्न केले. यांच्या दोघातील संभाषणाची पत्रं नंतरच्या काळात प्रसिद्ध झाली होती. मुलाच्या भेटीसाठी तडफडणाऱ्या आईचा चेहरा या पत्रांमध्ये स्पष्ट दिसून येतो.

एका मोठ्या कालावधीनंतर १८६३ साली त्यांच्या मुलासोबत त्यांची भेट झाली. राणी जिंदा कौर यांनी इंग्लंडमध्येच शेवटा श्वास घेतला. महाराज दिलीस सिंहांना त्यांच्या आईचे अंतिम संस्कार पंजाबमध्येच करायचे होते पण त्यांना परवानगी देण्यात आली नाही.

यानंतर त्यांनी गोदावरी काठी आई राणी जिंदा कौर यांच्यावर अंतिम संस्कार केले. नंतर त्यांनी आईचं स्मारकही बांधलं. एक साधारण युवती ते असाधारण योद्धा असा होता जिंदा कौर यांचा प्रवास.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button