चातुर्यानं जिंकलेल्या गेलेल्या युद्धांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का?

Maharashtra Today

प्रेमात आणि युद्धात जिंकण्यासाठी सारं काही माफ असतं ही म्हण उगाच आपल्यापर्यंत पोहचली नाही. प्रेमाच तर माहिती नाही परंतू युद्धा जिंकण्यासाठी शक्य त्या सर्वच चाली खेळल्या गेल्यात. इतिहासात अशा अनेक युद्धांच्या नोंदी (History of the wars) आहेत. इतिहासातल्या अशाच काही महत्त्वपुर्ण आणि रंजक युद्धांमध्ये ही म्हण खरी होताना दिसते.

शेतात बनवले होते विमानांचे मॉडेल

दुसऱ्या महायुद्धात शत्रुला चकवा देण्यासाठी अनेक चाली खेळल्या गेल्याच्या घटना नोंद आहेत. दुसऱ्या महायुद्धा दरम्यान अमेरिका आणि जपानमधील युद्धांचे प्रसंग आजही आठवले जातात. या युद्धात दोन्ही देशांनी एकमेकांना फसवण्यासाठी सर्व शक्यता अवलंबल्या होत्या. अशीच एक रंजक घटना जपानी सैन्यांबद्दल सांगितली जाते. अमेरिकेच्या वायु सैन्याला चकवा देण्यासाठी जपान्यांनी बांबूचे विमान बनवले होते. मोठ्या विस्तृत प्रदेशांवर ही विमानं ठेवण्यात आली होती. गवात लपवलेली ही विमानं नष्ट करण्यासाठी अमेरिकेचं वायुसैन्य या नकली विमानांवर तुफान बॉम्ब फेकायचे. यामुळं व्हायचं असं की जिथं खरोखरच बॉम्ब फेकून जपानी सैन्यांच नुकसान करणं शक्य आहे तिथं टाकायला बॉम्बच अमेरिकन वायु सैन्याकडे शिल्लक रहायचे नाहीत.

शिवाय जपानी सैन्यानं आणखी एक युक्ती लढवली होती. अमेरिकेच्या बी २९ या विमानाचे चित्र ते धावपट्टीवर रंगवायचे. आकाशतून बघितल्यावर अमेरिकेच्या विमानाच्या इंजिनाला आग लागली आहे असं त्यातून दिसायचं. त्या विमानाच्या मदतीला म्हणून अमेरिकन वायुसैन्यातली विमानं खाली यायची. विमानं टप्प्यात आली की जपानी सैन्या त्याच्यावर हल्ला चढवायचं.

फुग्यांनी बनवलेले रणगाडे

जपानी सैन्य चाल खेळत असेल तर अमेरिका मागे कशी राहिल. त्यांनी देखील शक्कल लढवली. त्यांनी रणागाडे आणि विमानांच्या आकाराचे मोठ्ठे फुगे बनवून घेतले. रेडीओ ट्रान्समीटर बनवण्यात आला. सैनिकांच्या धावपळीचा आवाज रेकॉर्ड करण्यात आले.स यामुळं जपानी सैन्याला त्या ठिकाणी युद्ध सुरु असल्याचं भ्रम व्हायचा. सैन्यासाठी लागणारी सामग्री आणि रणगाडे नष्ट करण्यासाठी ते मोठ्याप्रमाणात बॉम्ब फेकायचे. इतिहासकारांनी सैन्याच्या अशा फसव्या स्वरुपाला ‘घोस्ट आर्मी’ म्हणून संबोधलं आहे.

खोट्या शहरांनी वाचवली होती खरी शहरं

दुसऱ्या महायुद्धात ‘ऑपरेशन स्टारफिश’ (Operation Starfish) चा किस्सा प्रचंड गाजला. या कारवाईमुळं शत्रुसैन्याची मोठी फसवणूक करण्यात आली होती. ब्रिटीशांवर जर्मनीने तुफान बॉम्ब फेक केली अशावेळी जर्मनीला चकवा देऊन खऱ्या शहरांचा बचाव करण्यासाठी तिथल्या फिल्मसिटीत नकली शहर उभारण्यात आली. नकली गाड्या, रणगाडे, सैन्य मुख्यालये, तलावांचे चित्र असं सारं बनवण्यात आले. शत्रु राष्ट्रांची विमानं दिसली की कलाकार सेटला आग लावायचे. जर्मनी वायुसैन्याला भास व्हायचा की शहरं पेटली आहेत. त्यामुळं आदीच आग लागली असल्यामुळं इथं दारु गाळू वाया घालण्यात अर्थ नसल्याचं त्यांना वाटायचं. एक फिल्मसीटीनं संपुर्ण शहर वाचवलं होतं.

शिवछत्रपतींचा गनिमी कावा

भारतीय युद्धतंत्रात गनिमी कावा आणला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी.(Chhatrapati Shivaji Maharaj) त्यांचा हा सर्वात नवीन प्रयोग होता. आपली कमी माणसं गमावून शत्रु सैन्याला नमोहरम करुन सोडण्यात महाराज पटाइत. शाहिस्तेखानावर हल्ला करताना शिवछत्रपतींनी अशीच युक्ती लढवली होती. लाल महालावर छापा टाकून शाहिस्त्याची बोटं शिवछत्रपतींनी तोडली. पाठलाग करणाऱ्या सैन्यापासून पिच्छा सोडवण्यासाठी बैलांच्या शिंगाला मशाली बांधल्या. शाहिस्ते खानाच्या सैन्यांनी त्यांचा पाठलाग केला महाराजांनी आपला एकही माणूस न गमावता मोहिम फत्ते केली.

ही बातमी पण वाचा : भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना कधीकाळी मुघल दरबारात दररोज गयावया करावी लागायची!

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button