कमी गुंतवणूकीत लाखो मिळवून देणाऱ्या व्यवसायाबद्दल तुम्हाला माहितीये का?

Banana Chips

कोरोना (Corona) काळात लॉकडाऊनचा (Lockdown) अनेकांना फटका बसला. बऱ्याच जणांना पुन्हा कामावर रुजू होता आलेलं नाही. अनेकांचे व्यवसाय बंद आहेत तर बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्यात. कमी भांडवलात जास्त नफा देणाऱ्या व्यवसायांचा शोध सुरुये. कमीत कमी भांडवलात जास्त नफा देणारे व्यवसायाच्या शोधात लोक आहेत. दरम्यान या संकटकाळात व्यवसाय करताना कोणत्या गोष्टीची मागणी आहे, याचा देखील विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे कमीतकमी गुंतवणुकीत जास्तीत-जास्त नफा मिळवणारा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

अशा परिस्थीती बाजाराचा अभ्यास करणे गरजेचे असते. या अभ्यासातूनच नवा व्यवसाय समोर येतोय तो म्हणजे केळीचे चिप्स (Banana Chips) बनवण्याचा.बहूतांश कंपन्या केळ्याचे चिप्स बनवत आहेत. यातून ते लाखोंचे उत्पन्नही घेताहेत.

भारतात केळी (Banana) उत्पन्न होते मोठ्या प्रमाणात

जगभरारातील एकूण केळी उत्पन्नाच्या २५ टक्के केळी भारतात पिकवली जाते. १३० पेक्षा अधिक देशात केळीचे एकूण ७.५ दशलक्ष टन उत्पादन घेतले जाते. जागतिक क्रमवारीत केळी उत्पादनात भारताचा क्रमांक पहिला येतो. भारतात एकूण ५.२0 दशलक्ष टनासह महाराष्ट्राचा केळी उत्पादनात तमिळनाडू, गुजरातनंतर तिसरा क्रमांक लागतो. भारतात एकूण उत्पादित केळीचा ९० टक्क्यांपेक्षा अधिक वापर ताजे फळ म्हणून केला जातो. एकूण केळी उत्पादनाच्या केवळ ४ ते ५ टक्के केळीवर प्रक्रिया केली जाते. केळी हे एक खूप नाशवंत फळ असून पिकल्यानंतर फक्त ५ ते ६ दिवसांपर्यंत केळी चांगली राहते. इतक्या मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतल्या जाणाऱ्या या फळावर प्रक्रिया करुन. व्यवस्थित मार्केटींग केल्यास लाखो रुपये कमावता येतील.

केळ्याचे चिप्स बनवण्याची प्र्क्रिया

कच्च्या केळीचे काप खूप वेळ तळून चिप्प्स तयार केले जातात. ७५ ते ८० टक्के पक्वतेची केळी सोलून व चिप्प्स करून चांगल्या तेलात तळताना त्या तेलात १० टक्के मिठाचे द्रावण ओतावे लागते. चिप्प्स थंड झाल्यावर योग्य आकाराच्या प्लॅस्टिक बॅगमध्ये भरुन पॅक करावेत. कधी कधी अर्धपक्व केळीचासुद्धा चिप्ससाठी वापर करतात.

काय लागेल साहित्याच

केळ्याचे चिप्स तयार करण्यासाठी प्रामुख्याने कच्ची केळी, तेल, मीठ, मसाले या साहित्याची गरज असते. याचबरोबर विविध प्रकारच्या मशीन देखील गरजेच्या आहेत. या मशीनची यादी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. केळ्याचे चिप्स तयार करण्यासाठी केळ्याचे साल काढणारी मशीन, केळ्याचे काप करणारी मशीन, तळणारी मशीन, मसाले एकत्र करणारी आणि पॅकिंग करणाऱ्या मशीनची गरज आहे.

यंत्र कसे मिळले

केळीपासून चिप्स बनवण्याची प्रक्रिया समजल्यानंतर त्या प्रक्रियेसाठी लागणारे यंत्र. त्याच्या खर्च आणि कुठून ते यंत्र खरेदी करावं हे प्रश्न तुम्हाला पडले असतील. या यंत्राची किंमत साधारणपणे २८ हजार ते ५० हजार रुपयापर्यंत आहे. हे यंत्र बसवण्यासाठी चा ते पाच गुंठे जागा लागते.

कसं आहे व्यवसायाच गणित

एक किलो केळीचे चिप्स बनवायला साधारणपणे ७० रुपयांपर्यंत खर्च येतो. बाजारात प्रतिकिलो ९० ते ११० रुपयांपर्यंत केळीच्या चिप्स विकल्या जातात. साधारणपणे जरी प्रतिकिलो दहा रुपये मिळाला तरी रोज ४ हजार कमावणं शक्यय. म्हणजे महिन्या भरात २५ दिवस जरी व्यवस्थित व्यवसाय चालवला तरी १ लाखांपर्यंत पेसे कमवता येतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER