पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या महाराष्ट्रातल्या या पाच व्यक्तींबद्दल तुम्हाला माहितीये का?

पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या महाराष्ट्रातल्या या पाच व्यक्तींबद्दल तुम्हाला माहितीये का

भारतीय प्रजासत्ताक दिनी (Republic Day) विविध क्षेत्रातील मान्यवरांना पद्मश्री (Padma Shri) आणि पद्मभूषण पुरस्काराने (Padma Bhushan) सन्मानित करण्यात येते. या वर्षी देखील प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला १० जणांना पद्मभूषण तर १०२ जणांना पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आला.

महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उज्वल कामगिरी करणाऱ्या पाच जणांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.

  • सिंधूताई संपकाळ- सामाजिक कार्य
  • परशुराम गंगावणे- कला
  • नामदेव सी कांबळे- साहित्य आणि शिक्षण
  • गिरीश प्रभुणे – सामाजिक कार्य
  • जसवंतीबेन पोपट- उद्योग आणि व्यापार

या पाच जणांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलंय. ही मंडळी कोण आहेत आणि कोणत्या पद्धतीच काम यांच्यावतीनं करण्यात आलंय.

सिंधूताई सपकाळ (Sindhutai Sapkal)

महाराष्ट्रातील घराघरात सिंधूताई सपकाळ हे नाव पोहचलंय. १९९४साली त्यांनी पुण्यातल्या पुरंदर तालूक्यात अनाथ मुलांसाठी ‘ममता बाल सदन’ नावाची संस्था स्थापन केली. नंतरच्या काळात हे काम तालूक्यापूरतं मर्यादीत राहीलं नाही. संस्थेनं संपूर्ण महाराष्ट्रभर काम करायला सुरुवात केली. महाराष्ट्रासह देशभरात अनाथांची माय म्हणून त्यांना ओळखलं जातं.

गेल्या ४० वर्षांपासून अनाथांची माई बनलेल्या सिंधूताईंना ७५०हून अधिक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. १ हजार मुलांचा सांभाळ सध्या सिंधताई करताहेत.

परशुराम गंगावणे (Parshuram Gangawane)

गेल्या ४५ वर्षांपासून आदिवासी कला जोपासण्याचं, त्याचा प्रचार प्रसार करण्याच काम परशुराम गंगावणे करताहेत. आदिवासी कलेला देत असलेल्या पुनर्जीवनाबद्दल त्यांना यंदाचा कला क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. कोकणाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली कळसुत्री बाहूलीची कला त्यांनी जोपासली आहे. आदीवासी कला जोपासण्यासाठी त्यांनी गुरे आणि गोठा विकला. त्याठिकाणी त्यांनी आदिवासी कलेच्या प्रदर्शनासाठी संग्रहालय बनवलंय. कला आंगण ट्रस्ट त्यांनी सुरु केलं असून संग्रहालयात पपेट, चित्रकथा आणि कळसुत्री पहायला मिळतात.

नामदेव कांबळे (Namdev Kamble)

संपूर्ण महाराष्ट्रात ‘राघववेळ’ कादंबरीसाठी ओळखले जाणारे विदर्भातले लेखक नामदेव कांबळे यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातल्या योगदानासाठी पद्मश्री परस्काराने गौरवण्यात आलंय. गावकुसाबाहेरच्या स्त्रियांच्या वेदना त्यांच्या लेखनीनं मांडल्या. १९९५ला त्यांच्या राघववेळ या कादंबरीला साहित्य आकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

वाशीम जिल्ह्यातल्या शिरपूर गावात एका शेतमजूर कुटुंबात जन्मेलेल्या नामदेव कांबळेंनी मोठ्या अडचणींवर मात करत शिक्षण पूर्ण केलं. वाशीमच्या राणी लक्ष्मीबाई शाळेत सुरक्षारक्षकाचं सुरुवातीला काम करणारे नामदेव कांबळे त्याच शाळेत शिक्षक म्हणून रुजु झाले होते.

त्यांनी एकूण आठ कादंबऱ्या, चार कविता संग्रह, दोन कथासंग्रह लिहले आहेत. बालभारत्याच्या अध्यक्षपदीही त्यांनी काम केलेलं आहे.

गिरीश प्रभुणे (Girish Prabhune)

भटक्या विमुक्त उपेक्षित घटकासाठी काम करणाऱ्या लोकांसाठी सामाजिक कार्य क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार गिरीश प्रभुणे यांना जाहीर झाला.

भटके विमुक्त समाज परिषदेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून ते कार्यरत आहेत. तुळजापूर जवळील वैदू, कैकाडी, पारधीसामाजातील मुलांसाठी त्यांनी काम केलंय. चिंचवडमधल्या ‘पुनरुत्थान गुरुकुलम’मधील भटक्या समाजातील मुला- मुलींच्या शिक्षण आणि कौशल्यविकासासाठी त्यांनी काम केलंय.

‘पारधी’ समाज्याच्या प्रश्नांवर त्यांनी ‘पारधी’ हे पुस्तक लिहीलंय.

जसवंतीबेन पोपट (Jaswantiben Popat)

मुंबईच्या गिरगाव परिसरात राहणाऱ्या जसवंतीबेन यांनी त्यांच्या सात मैत्रिणींच्या मदतीने काम सुरु केलं. आणि बघता बघता त्यांच्या कामानं संपूर्ण जगात ओळख निर्माण केली. संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेल्या लिज्जत पापडच्या उद्योग त्तयांनी उभारला. यंदाच्या वर्षी उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील पद्मश्री पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER