सिरीयात संस्कृत भाषिकांचं राज्य प्रस्थापित करणाऱ्या मितन्नी साम्राज्याबद्दल तुम्हाला माहितीये का?

Maharashtra Today

आजपासून साडेतीन हजार वर्षांपूर्वी पश्चिम आशियातल्या सिरीयामध्ये एका विशाल साम्राज्याचं शासन होतं. नाव मितन्नी साम्राज्य (Mitanni Empire). बोगजकोय संस्कृतीचे मिळलेले परातत्व अवशेष इसवी सन पुर्व १४ व्या शतकातले असल्याचं समजतं. या अवशेषावरुन कळतं की तिथली राजभाषा संस्कृत (Sanskrit) होती. या साम्राज्यात होऊन गेलेल्या सम्राटंची नावं ही हिंदू देवतांची होती. इंद्र, दशरत, आर्ततम इत्यादी.

हिंदूंची भाषा मानली जाणारी संस्कृत भाषा भारतात विकसीत झाल्याचं आजवर बोललं जातं; पण मितन्नी साम्राज्याचा इतिहास वरील तथ्याला खोटं ठरवतंय. भारतापासून हजारो किलोमीटर अंतरावर संस्कृत फक्त पोहचली नाही तर कशी झाली तिथली राजभाषा याचं उत्तर रहस्यमयी आहे.

प्राचिन अँटोलियात होतं मितन्नी साम्राज्य

इसवी सन पूर्व १५०० ते १३०० मध्ये सिरियाच्या अँटोलिनामध्ये मितन्नी साम्राज्यानं विस्तार केला. याचं अँटोलिनीयन भाषेत ‘आर्य’ हा शब्द आढळतो. या शब्दाचा उल्लेख सिरियात सापडलेल्या अनेक शिलालेखांवर सापडतो. आजपासून साडेतीन हजार वर्षांपूर्वी सध्याच्या आशियात य़ुफ्रेटस आणि टिगरीस नदीच्या तीरावर मितन्नी साम्राज्याचं राज्य होतं. हा इलाका आता इराक, तुर्किस्तान आणि सिरीयाच्या हिस्स्यात येतो. भूमध्य सागरापासून ते मेसोपोटामियापर्यंत या साम्राज्याचा विस्तार होता. त्याच्या सीमा हित्तीयांच्या हित्ती साम्राज्याला लागून होत्या. दोन्ही साम्राज्यात यावरुन वाद होता. हा वाद करार करुन सोडवण्यात आला.

इसवी सन पूर्व १४०० काळात कोरलेल्या शिलालेखात सम्राट शुब्बिलिम्मा आणि मितन्नी सम्राट मतिउअजा यांच्यात सीमा प्रश्नांवरुन करार झाला. मितन्नीचा सम्राट या करारासाठी साक्षीदार म्हणून ‘इंद्र, वरुण, मित्र आणि नासत्य’ या वैदिक देवांचा उल्लेख करण्यात आलाय.

राजवंशात आढळात संस्कृत नावं

मितन्नी राजवंशात प्रत्येक सम्राटाचं नाव संस्कृत भाषेतलं होतं. ‘पुरुष, दुश्रत्त, सुवरदत्त, इंद्रतो आणि सुंबंधु’ सारखी अनेक नावं होती. इतकच नव्हे तर राजधानीचं नाव होतं ‘वसुखनि’ हे नाव सुद्ध संस्कृत भाषेतलं आहे. ऋगवेदी संस्कृतमधील लिखाणाबद्दलचा उल्लेख ही मितन्नी साम्राज्यात आढळतो. मित्तानी राजवंशमामधील सम्राटांची नावं किर्त्य, सत्वर्ण, वरतर्ण, बरात्तर्ण, आर्ततम, अर्थसुमेढ, तष्यरथ,दशरथ, सत्वर्ण, मतिवाज, क्षत्रवर, वसुक्षत्र अशी होती. मितन्नी साम्राज्याचे लोक महाभारतानंतर सिरीयात आले. काही इतिहासकार मितन्नी साम्राज्यातले लोक मैत्रायणीय शाखेतून आल्याचे संदर्भ देतात.

म्हणून सिरीयात आढळतात संस्कृतच्या खुना

वैदिक संस्कृत ज्या परिवारातून येते. याची मुळं ‘प्रोटो- इंडो- युरोपीयन’ भाषेत सापडतात. या भाषेला संस्थापक भाषा असं ही म्हणलं जातं. नंतर या भाषेतून ‘प्रोटो- इंडो- इराणी’ भाषेचा जन्म झाला. यामुळंच इराणी भाषेचा आणि उत्तर भारतातील भाषेचा स्त्रोत एकच असल्याच मानलं जातं.

संस्कृतच ज्ञान इसवीसन पुर्व २ हजार वर्षापासून होतं असं मानलं जातं. त्यामुळं संस्कृत एका हिंद- आर्य भाषेप्रमाणं ती हिंद- युरोपीय भाषा परिवाराची शाखा आहे. मराठी, हिंदी, सिंधी, पंजाबी, नेपाली सारख्या अधुनिक भाषा याच हिंद – युरोपीय भाषेपासून उत्पन्न झाल्याचं बोललं जातं.

आर्य आणि संस्कृत संबंध

तज्ञांच्या मते सिरीया, बोगजकोय इत्यादी भाषा वैदिक भाषेप्रमाणेच आहेत. त्यामुळं या भाषा वैदिक काळाच्या समांतर असल्याचं मानलं जातं. इराणी लोकांनी माघार घेतल्यानंतर आर्यांचा बोगजकोयशी काही संबंध नव्हता. पीमारच्या पठारावरुनच आर्य इराण आणि सिरीयामध्ये शिरल्याच मानलं जातं. बेबीलॉनमधील कस्साइट लोकांमध्ये भारतीय आर्य देवतांची नावं आढळतात, उदा. सुरिअ, मरुत्तस, बुगुस, इंद्रस ही नावं आढळतात. इसवी सन पूर्व १७६० मध्ये बेबीलॉनमध्ये कस्साइट लोकांनी राज्य स्थापित केलं होतं. ‘हिंदी- युरोपीयन’ परिवारातील भाषांमध्ये ज्या शब्दांचा परस्पर संबंध नाही असे शब्द जोडले गेलेत.

संस्कृत भाषेशी मिळती जुळती आहे हुर्रियन भाषा

इसवी सन पुर्व १५ व्या शतकापर्यंत तुर्कीस्तान, सिरीया, उत्तरेकडील इरका आणि पश्चिमेच्या इराण प्रदेशावर मितन्नी सम्राटांचा ताबा होता. याक्षेत्रात हुर्रियन भाषा बोलली जायची. ही भाषा इंडो-युरोपीय भाषेशी संबंधित नाही. तर मितन्नी सम्राटांपैकी बरेच जण हुर्रियन भाषा बोलायचे. ही भाषा संस्कृत प्रमाणाचं असल्याची नोंद इतिहासानं घेतलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER