‘सालवा जुडूम’ या नक्षलवादाविरुद्ध सुरु झालेल्या पहिल्या ऑपरेशनबद्दल तुम्हाला माहितीये का?

Maharashtra Today

छत्तीसगडच्या दंतेवाडातल्या आरनुपमध्ये पहिल्यांदा बंदूकीच्या गोळ्या चालल्या. मुठभर जनतेनं दिलेला हा हुंकार होता. ज्यांचा छातीला भेदून यांच्या गोळ्या गेल्या ते सामान्य लोक होते. दंतेवाडा आता तरी शांत असेल ही उमेद घेऊन ते परत आले होते. छत्तीसगडच्या जंगलात काही चांगलं घडेल याची आशा ठेवणंच मुळा अयोग्य अशी परिस्थीती होती. अनेक दशकांपासून छत्तीसगडची जंगलं शांत नाहीयेत.

दैनंदिन आयुष्याला कंटाळून लोक जंगलात समाधान आणि शांती शोधण्यासाठी येतात. पण छत्तीगड, झारखंड, कर्नाटक राज्याची जंगलं दहशतीनं भरलेली आहेत. ही दहशत जंगली जनारवरांची नाही, सामान्य माणासांची आहे ज्यांना नक्षलवादी हे नाव देण्यात आलंय.

२००५ साली या नक्षली भागात ‘सालवा जु़डूम’ या नावाखाली शांती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जेव्हा सेना, पोलिस आणि सरकारनं प्रयत्न सोडले तेव्हा सामान्य जनतेनं हातात बंदूका घेतल्या. नक्षलवाद्यांचा नायनाट करुन शांती प्रस्थापित करण्याचा त्यांचा विचार होता. त्यांनी विचार केला तसं घडलं? शेवटी ‘सालवा जुडूम'(Salwa Judum)चंकाय झालं. छत्तीसगडच्या एकूण वातावरणावर या माहिमेने कसा परिणाम केला हे जाणून घेणं गरजेचं आहे. कारण त्यांनी नक्षलींशी दोन हात केले होते.

… आणि नक्षलवाद्यांची झोप उडाली

छत्तीसगडचा दंडेवाडा इलाका नक्षलवाद्यांची कर्मभूमी आहे. दंतेवाडात रक्ताचे पाट वाहणं ही नक्षलवाद्यांसाठी अभिमानाची बाब मानली जातो. छत्तीसगडच्या सरकारसाठी नक्षलवादी मोठी अडचण निर्माण करत होते. दंतेवाडीची चौकट पोलिस, सैन्य आणि सरकारला न ओलांडता येत होती न मोडता येत होती. तेव्हा अचानक तिथल्या दोनशी गावांनी नक्षलवाद्यांविरुद्ध बंडाचं निशाण उचललं. नक्षलवादमुक्त छत्तीसगड करण्यासाठी सशस्त्र मोहिमेला सुरुवात झाली जिचं नाव ठेवण्यात आलं होतं. ‘सालवा जुडूम’ म्हणजेच शांती प्रस्थापित करणे.

सालवा जुडूम हा गोंडी भाषेतला शब्द आहे. ज्याचा अर्थ शांती प्रस्थापित करणे असा होतो. अहिंसेच्या मार्गाचा वापर करुन नक्षलवादी चळवळीचा खात्मा करण्याचं ध्येय या अभियानाचं होतं. राज्य आणि केंद्र सरकारचं समर्थन या आंदोलनाला प्राप्त होत. या मोहिमेला अधिक बळकटी देण्यासाठी ‘अतिरिक्त सुरक्षा बल’ तैनात करण्यात आलं होतं. इथल्या गावकऱ्यांना शासकीय पोलिसांनी खबरी काढणे, बंदूकीचा निशाणा लावणं हे प्रशिक्षण दिलं होतं. खबरीचं काम करणाऱ्या गावकऱ्यांना २१०० रुपये पगार दिला जायचा. इतर कोणत्या नक्षलवादी विरोधी कारवाईत सामील झाल्याबद्दल त्याला ३ हजार रुपये दिले जात. या आंदोलनामुळं नक्षलवादी विरोधी कारवाईत यश येऊ लागलं.

अहिंसेच्या आडून हिंसा

या माहिमेअंतर्गत नक्षलवादीग्रस्त गावातील सामान्य लोक आणि आदिवासींना सामील करण्यात आलं. त्यांना विश्वास दिला होता की गांधींच्या मार्गावर चालून हे आंदोलन पुर्णत्त्वाला न्यायचं आहे. आंदोलन, ,सत्याग्रह, विरोध प्रदर्शन असं मोहिमेचं स्वरुप असेल हे सांगण्यात आलं पण झालं मात्र भलतच. हळू हळू गावकरी, आदिवास्यांच्या हातात चाकू, गावठी कट्टे, धनुष्य बाण, तलवाऱ्या, कोयते आणि परत बंदूका देण्यात आल्या.

या गावच्या लोकांना दोन वेळचं खायला धड भेटन नव्हतं. त्यांना पोलिसांची वर्दी चढवण्यात आली. वेतन सुरु झालं. हे काम करणंत त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय बनलं होतं. नक्षलवाद्यांचे अनेक डाव यांनी उधळले. अनेकांना अटक झाली. बरेच जण इंकाउंटरमध्ये मारले गेले. यामुळं नक्षलवाद्यांच्या मनात सालवा जुडूमची धास्ती निर्माण झाली तर या आंदोलनाचा म्होरक्या महेंद्र कर्मा याच्याबद्दल नक्षलवाद्यांच्या मनात राग निर्माण झाला.

सलाव जुडूम आंदोलन ठरलं असंविधानिक

नक्षलवादी विरुद्ध सालवा जुडूम यांच्यात इर्षा वाढायला लागली. रक्त दोन्ही बाजूंनी वाहू लागलं. नक्षल्यांना त्यांच्या साथीदारांच्या मरणाचा बदला घ्यायला होता. २००६ साली द्रोणपालमध्ये सालवा जुडूमच्या तीस कार्यकर्त्यांना रस्त्यात सुरुंग उडवून जीवे मारलं. आदीवासांच्या गावावरही त्यांनी हल्ले केले. नक्षलवाद्यांनी आंदोलनाशी संबंधित नसलेल्या सामान्य लोकांनाही जीवे मारलं. त्यांना पुन्हा दहशत प्रस्थापित करायची होती. ते यशस्वी झाले. ७०० गावातील आदिवासींनी गाव सोडून पळ काढला.

नक्षलवाद विरुद्ध सालवा जुडूमची लढाई निर्णायक टप्प्यावर होती. १ लाख आदिवासी बेघर झाले. आदिवासी लोकांसाठी महेंद्र कर्मा आता खलनायक होता. २००८ साली महेंद्र कर्माची प्रतिष्ठा मुख्यमंत्री रमण सिंहांच्या तोडीस तोड होती. पण तरी त्यांचा पराभव झाला. यानंतर सालवा जुडूम आंदोलकर्त्यांवर असलेली सरकारी मर्जी काढून घेण्यात आली.

मानव अधिकार संघटनांनी आदिवासींच्या पलायनाची बाब सर्वोच्च न्यायालयात नेली. माओवाद्यांशी सामना करण्याची जबाबदारी पोलिस आणि सैन्याची असल्याचं सांगितलं. स्थानिक लोकांचा जीव धोक्यात घालणं योग्य नस्लयाचं सांगत २००८ साली या आंदोलनाला असंविधानिक ठरवून बंद करण्यात आलं.

अचानकच सरकारी समर्थन काढून घेतल्यामुळं सालवा जुडूमचे कार्यकर्ते रस्त्यावर आले. पोलिस आणि नक्षलवादी या दोघांच्या निशाण्यावर ते होते. त्यांना कोणतचं संरक्षण मिळालं नाही. नक्षलवाद्यांनी या मोहिमेतील प्रत्येकाला शोधून शोधून मारलं. या आंदोलनाचे नेते महेंद्र कर्मा यांनी अनेक हल्ल्यात मरणाला चकवा दिला पण २३ मे २०१३ ला नशिबानं त्यांची साथ दिली नाही. कॉंग्रेस परिवर्तन यात्रावर मोठा हल्ला या दिवशी झाला. यात महेंद्र कर्मा आणि कॉंग्रेस अध्यक्षांसह २३ लोकांचा जीव गेला. आज पर्यंत सालवा जुडूमशी संबंधित १५० लोकांची नक्षलवाद्यांनी हत्या केलीये. वारंवार होणाऱ्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा हे आंदोलन त्याच ताकदीनं उभं करण्याचा आवाज छत्तीगडमध्ये पुन्हा बुलंद होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button