जागतिक स्तरावर भारतीय बॉक्सिंगची हवा करणाऱ्या हवासिंग यांच्याबद्दल तुम्हाला माहितीये का?

Hawa Singh

भारतात आज बॉक्सिंगला प्रतिष्ठा मिळलीये. पण एक काळ असा होता जेव्हा बॉक्सिंगला प्रतिष्ठा तर दुर प्रसिद्धीही मिळाली नव्हती. ते दशक होतं १९५०चं. तेव्हा एका बॉक्सनं या खेळात एँट्री घेतली आणि बॉक्सिंगची भारतभर हवा झाली. त्या बॉक्सरच नाव होतं हवासिंग.

त्यांच्या एका पंचनं समोरचा बॉक्सर अडवा व्हायचा. नॅशलपासून इंटरनेशनल स्तरापर्यंत हवासिंग (Hawa SIngh) यांच्या नावाची दहशत होती. असं त्यांच्यात काय होतं की त्यांना महान बॉक्स म्हणून जगभरात ख्याती मिळाली?

११ वेळा जिंकलीये राष्ट्रीय स्पर्था

१६ डिसेंबर १८९३ला हरयाणाच्या छोट्याश्या गावी जन्मलेले हवासिंग पुढं जावून बॉक्सर बनतील असं कुणालाच वाटलं नव्हतं. त्यांच्या लहानपणी न त्यांनी बॉक्सिंग पाहिली होती न त्याबद्दल ऐकलं होतं. गावातल्या इतर लोकांप्रमाणे ते शेतीकामात असत. पण शेतीच्या उत्पन्नावर त्यांचा घरखर्च चालत नव्हता. हवासिंग यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. वर्ष १९५६ला वयाच्या १९व्या वर्षी ते सैन्यदलात भर्ती झाले. भर्ती झाल्यावर त्यांना कळलं की अन्य खेळातही त्यांना भाग घेता येवू शकतो. तिथंच त्यांनी पहिल्यांदा बॉक्सिंग बघितली. आणि निर्णय घेतला की या खेळात भाग घ्यायचा. मजबूत शरियष्ठीच्या जोरावर त्यांची बॉक्सिंगसाठी निवड झाली.

बॉक्सिंगला सुरुवात झाली. हवासिंग यांनी स्वतःला पुर्णपणे या खेळात झोकून दिलं. प्रचंड चिकाटीनं ते बॉक्सिंग शिकले. खुप कमीवेळात त्यांनी बॉक्सिंगमध्ये महारथ मिळवली होती. वेळेसोबत त्यांनी स्वतःलातयार केलं. त्यांच नाव बॉक्सिंग क्षेत्रात प्रसिद्ध झालं.

महोब्बत सिंग नावाच्या बॉक्सरचं त्यावेळी मोठं नाव होतं. सैन्यदलातला तो स्टार बॉक्सर होता. मोहब्बत सिंगबद्दल कळाल्यावर हवासिंगानी त्याला थेट फायटसाठी आव्हान दिलं. हा सामना हवासिंगांसाठी अवघड होता. मोहोब्बतसिंग अनेक वर्षांपासून या खेळात तरबेज होते तर हवासिंगांची नविनच एँट्री झाली होती. १९६०ला दोघांच्यात लढत झाली त्यामुळं त्यांच आयुष्यच बदललं. या सामन्यात हवासिंगांनी असा विषय मिळवला की त्यांची निवड थेट नॅशनल गेम्ससाठी झाली.

भारतीय सैन्यदलातील स्टार बॉक्सरचा खिताब हवासिंगांनी जिंकला. आताबारी होती नॅशनल गेम्सची. १९६१-१९७२पर्यंत सलग ११ वेळा त्यांनी नॅशनल गेम्सची स्पर्धा जिंकली. त्यांचा पराभव करु शकेल असा एकही बॉक्सर भारतात नव्हता. त्यांनी खेळाच्या जोरावर एशिनय गेम्सच तिकीट मिळवलं.

एशियन गेम्समध्ये गाजवलं भारताच नाव

नॅशनल गेम्समध्ये स्वतःच्या नावाला हवासिंगांनी सिद्ध केलं होतं. पण आता देशाचं नावं मोठ करण्याची बारी होती. १९६२च्या एशियन गेम्समध्ये हेवीवेट बॉक्सिंगसाठी हवासिंगांचे नाव पाठवण्यात आलं होतं पण त्यावेळी ते स्पर्धेत सहभाग घेवू शकले नाहीत. त्यावेळी भारत चीन युद्धाची चिन्ह होती. सीमेवर तणाव होता. त्यामुळं देशाशी असलेलं कर्तव्य महत्त्वाचं असल्यानं त्यांनी स्पर्धेत भाग घेतला नव्हता.

१९६६ला पुन्हा त्यांच्याकडे संधी आली बॉक्सिंग स्पर्धेत भाग घेण्याची. तिथं त्यांनी अशी दमदार खेळी दाखवली की कुणीच त्यांच्यासमोर टिकू शकलं नाही. भारतासाठी सुवर्ण पदक घेवूनच ते माघारी आले. यांनंतर संपूर्ण भारतात त्यांच्या नावाची चर्चा होवू लागली. १९७०ला त्यांना पुन्हा एशियन गेम्समध्ये खेळण्याची संधी मिळाली. यावेळीही त्यांनी अजिंक्यपद अबाधित ठेवत दुसऱ्यांदा भारताताला सुवर्णपदक जिंकवलं.

हवासिंग भारतीय बॉक्सिंगचा चेहरा बनले होते. भारतात फक्त त्यांच्या नावामुळं बॉक्सिंगबद्दल लोकांना कळू लागलं.

बॉक्सिंग क्लबमध्ये बनवले भविष्यातले बॉक्सर

अनेक वर्ष भारतासाठी बॉक्सिंग केल्यानंतर त्यांनी निवृत्ती घेतली. १९८०पर्यंत त्यांची सैन्यदलातली नोकरीही पुर्ण झाली होती. रिटायर झाल्यानंतर ते हरयाणाला परतले. क्रिडा आयोगाला सांगून त्यांनी हरयाणात बॉक्सिंग क्लब उभारला. बॉक्सिंग कल्बच्या माध्यमातून देशाला बॉक्सर मिळावेत अशी त्यांची इच्छा होती. क्रिडा आयोगानं हवासिंग यांनाच प्रशिक्षक म्हणून नेमलं. तिथं अनेक बॉक्सर हवासिंगांनी घडवले.

२०००साली त्यांना द्रोणाचार्य पुरस्कारनं सन्मानित करण्यात आलं. यानंतर १५ वर्षानी त्यांचे निधन झाले. भारताचा पहिला बॉक्सिंग स्टार अवकाशातून निखळला.

त्यांच्यामुळच देशात बॉक्सिंग खेळाची लाट निर्माण झाली. त्यांचे यश बघूनच अनेक युवकांनी बॉक्सिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER