तीस सेकंदात १६ जणांची डोकी उडवणाऱ्या स्नायपरबद्दल तुम्हाला माहितीये का?

sniper

तासंतास एका ठिकाणी दबा धरुन बसणं. बोट रायफलीच्या ट्रिगवर आणि टेलिस्कोपमधून गमिनावर नजर. शत्रु दिसला की दुसऱ्या मिनीटात गोळी त्याच्या डोक्याचा वेध घेणारी गोळी. हे काम फक्त एक खतरनाक स्नायपरच करु शकतो. पण फक्त तीस सेकंदात १६ जाणांचा हेडशॉट देणाऱ्या स्नायपरबद्दल तुम्हाला माहितीये का?

हा किस्सा आहे अमेरिका आणि व्हिएतनाम युद्धातल्या सैनिकाचा. अमेरिकन सैन्य व्हिएतनाम युद्धात प्रत्येक कानाकोपरा शोधूनही त्यांच्या पदरी निराशा होती तर दुसरीकडं चार्ल्स चक नावाच्या सैनिक एक एकाला शोधून शोधून मारत होता. तो अमेरिकेचा सर्वात खतरनाक स्नायपर होता.

वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत सैन्यात झाला भर्ती

अमेरिकेत वाढलेल्या चार्ल्सचे वडील सैन्यदलात होते. दुसऱ्यायुद्धात ते अमेरिकेच्या बाजूने लढले. देशसेवा करायची संधी आपल्यालाही मिळावी अशी चार्ल्सच स्वप्न होतं. सैन्यात भर्ती होण्याऐवजी त्याच्याकडं दुसरा कुठला पर्याय नव्हता. त्यामुळं लहानपणापासून चार्ल्सने स्वतःला सैन्यभरतीसाठी तयार केलं. १९६७ला चार्ल्स सैन्यात भर्ती झाले आणि तिथून पुढं सुरु झाला स्नायपर बनण्याचा प्रवास. स्नायपरची ट्रेनिंग सुरु झाली. चार्ल्सला हे काम अवडायला लागलं होतं. त्याच्या बॅचमध्ये तो सर्वोतकृष्ठ होता. दिवसेंदिवस त्याचा निशाणा पक्का होत होता.

ट्रनिंग संपली आणि अमेरिका व्हिएतनाम युद्धाला सुरुवात झाली. चार्ल्सची रवानगी या युद्धात करण्यात आली. देशाासाठी लढता यावं हे चार्ल्सच लहानपणापासूनचं स्वप्न पुर्ण होणार होतं.

सैन्यविमानातून त्यांच्या तुकडीसह चार्ल्स व्हिएतमानमध्ये दाखल झाला. प्रत्येक सैनिक व्हिएतनामच्या खतरनाक जंगलात लढायला जाण्यास घाबरत होता. तर दुसरीकडे चार्ल्स उत्सूक होता.

टीमला कव्हर देणं होतं गरजेचं

चार्ल्सनं त्याची आवडती एम-४० निवडली. व्हिएतनामच्या जंगलात शत्रुसैन्याचा खात्मा करायला ही बंदूक कामाची होती. व्हिएतनामच्या जंगलात लढणं काय सोप्प काम नव्हतं. व्हिएतनामचे सैन्य कुठून कसा हल्ला करेल याचा नेम नसायचा. अशा परिस्थितीत प्रत्येक टीम सोबत एक स्नायपर असायचा. जो दुर थांबून टीमला कव्हर करेल. चार्ल्सच हेच काम होतं. त्याची टीम जेव्हा नदी किंवा एखादा नाजूक रस्ता ओलांडायची तेव्हा तो टीमला कव्हर करायचा. अशावेळी अनेकदा शत्रुसैन्याचे हल्ले झाले. चार्ल्स यांनी शत्रुसैन्यांला वेळीच हेरायलं आणि प्रत्येकाचा खात्मा केला होता. एक जरी शत्रु वाचला तर तो आपल्या टीमच्या सैनिकाचा जीव घेवू शकतो याची त्याला कल्पना होती. यातल सर्वात कठीण काम होतं एकाच गोळीत शत्रुला खल्लास करणं. यासाठी बऱ्याच धैर्याची गरज होती. पहिली गोळी जर चुकली तर शत्रु सावध व्हायचा आणि तिथून पळ काढायचा. आणि पुढं जावून चार्ल्सच्या टीमपैकी कुणाच्याही मरणाचं तो कारण बनायचा.

३० सेकंदात घेतला होता १६ जाणांचा जीव

तो दिवस व्हॅलेटाइन डेचा होता. ज्या दिवशी संपूर्ण जग प्रेमाचा उत्सव साजरा करत होती त्या दिवशी चार्ल्स आणि त्याच्या टीम सोबत मरण लपनडाव खेळत होतं. रात्रीची वेळ होती. त्यांना अंधारातच नदी पार करायची होती. नेहमी प्रमाणे चार्ल्स रायफल घेवून टीमपासून लांबच्या अंतरावरुन चालत होते. इलाक्यावर नजर ठेवून होते. त्याने बंदूक बदलली होती आता त्यांच्याजवळ होती एम-१४ ज्यात नाईट व्हिजनची सुविधा होती. चार्ल्स टीमसोबत नदी ओलांडत असताना त्याने पाहिलं की व्हिएतनामी जवानांची एक तुकडी त्यांच्या दिशेने येतीये.

व्हिएतनामी जवान हल्ला करण्याच्या तयारीने येत होते. क्षणाचाही विलंब न करता चार्ल्सने निशाणा लावयाल सुरुवात केली. प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. चार्ल्सने दिर्घ श्वास घेतला आणि ट्रिगर दाबला पहिली गोळी व्हिएतनामच्या जवानाचं डोक्यातून आर पार गेली. गोळीचा आवाज ऐकून व्हिएतनामी सैनिक सावध झाले. पण चार्ल्सने शत्रुला कोणतीच संधी दिली नाही. मरणाशिवाय त्यांच्याजवळ पर्याय नव्हता. एकानंतर एक तीस सेकंद सलग त्याने गोळा चालवल्या आणि मगच तो शांत झाला. व्हिएतनामी सैन्याची आर्धी तुकडी गारद झाली होती. चार्ल्सने सोळा गोळ्या चालवल्या. १६च्या १६ गोळ्या शत्रुच्या डोक्याच्या पार गेल्या. त्याच्या टीमचा जीव तर वाचवलाच पण स्नायप क्षेत्रातल इतिहास रचला. इतका कमी वेळात इतके हेडशॉट्स याआधी कुणीच घेतले नव्हते चार्ल्सने तो विक्रम करुन दाखवला.

यासाठी एकाच गोळीत शत्रुला मारणं खूप गरजेच होतं. मग दिवस असो वा रात्र शत्रु जिथं दिसेल तिथं त्याला मारणं गरजेचं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER