तुम्हाला एकच मुलगी का? शरद पवारांनी दिलेले उत्तर अभिमानास्पद

Supriya Sule - Sharad Pawar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचा आज ८० वा वाढदिवस काल थाटात साजरा झाला . राज्याच्या राजकारणातील मोठं नाव असणाऱ्या शरद पवारांचा राजकीय वारसा त्यांची मुलगी सुप्रिया सुळे (Supriya Sule) पुढे चालवत आहेत. सुप्रिया सुळे शरद पवारांच्या एकुलत्या एक मुलगी आहेत. यावर त्यांनी यामागे काय कारण आहे ते त्यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले होते .ते उत्तर ऐकून तुम्हालाही अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही.

मुलगा हवाच याचा हट्ट असताना तुम्हाला एकच मुलगी कशी काय? असा प्रश्न तुम्हाला लोक विचारत असतील. त्याचं समाधान तुम्ही कसं करता असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता. यावर शरद पवारांनी उत्तर देताना सांगितले होतं की, या प्रश्नाला मला अनेकदा उत्तर द्यावं लागतं. खेड्यापाड्यात गेल्यानंतर लोक मुलगा असता तर बरं झालं असं म्हणतात. शेवटी नाव चालवायला घरात कोणीतरी पाहिजे किंवा बरं वाईट झालं तर अग्नी देण्यासाठी पाहिजे.

मुलानेच अग्नी दिला तर स्वर्गाचा रस्ता खुला होतो असंही अनेकजण शरद पवारांना सांगायचे. पण हा प्रत्येकाचा पहायचा दृष्टीकोन आहे. मला असं वाटतं अग्नी देण्यासाठी कोण असणार याची चिंता करायची की जिवंत असताना नीट नेटकं वागणाऱ्याची चिंता करायची. मुलगा आणि मुलीकडे पाहण्याचा भारतीय समाजव्यवस्थेचा जो दृष्टीकोन बदलण्याची गरज शरद पवारांनी व्यक्त केली होती.

मुलीला सुद्धा मुलासारखं वाढवून, समान वागणूक देऊन, आत्मविश्वास वाढवून तिच्याकडून उत्तम प्रकारचे काम करुन घेऊ शकतो. व्यक्तिमत्व फुलवो शकतो याची मला खात्री आहे, असेही शरद पवार म्हणाले होते.

आम्ही सतत सगळ्या देशाला, महाराष्ट्राला कुटुंब नियोजन करा म्हणून मार्गदर्शन करत राहणार आणि आपल्या घऱात भरपूर गर्दी योग्य दिसणार नाही. कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि आपण जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत इतर जणही थांबण्याचा विचार करत नाहीत. त्याचदृष्टीने मुलीवरच समाधान मानण्याची भूमिका मी आणि पत्नीने घेतली, असा उलगडा शरद पवारांनी केला होता.

या मुलाखतीत प्रतिभा पवार यांनीही या प्रश्नाचे उत्तर दिले होते . त्या म्हणाल्या होत्या की, एकच मुलगी आहे म्हणून मला कधीच दुख: झालं नाही. मुलगा नाही अशी शंकाही कधी माझ्या मनात आली नाही. आम्ही दोघांनी मिळून हा निर्णय घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER