“तुमच्याकडे पंतप्रधान पदाचा अनुभव आहे का?” नेहरुंना प्रश्न करणाऱ्या नाथू सिंह राठोडांची गोष्ट!

Maharashtra Today

ठाकूर नाथू सिंह राठोड, बिटनच्या ‘सँडहर्स्ट रॉयल मिलिट्री अॅकेडमी’तून(Sandhurst Royal Military Academy) उत्तीर्ण होणारे दुसरे भारतीय ऑफीसर.पुढं तीन स्टार रँकवाले जनरल बनले. पहिले होते राजेंद्रसिंह जडेजा जे के.एम. करिअप्पा यांच्यानंतर सैनअध्यक्ष बनले होते. ठाकुर नाथुसिंह(Nathu Singh Rathore) यांना सैन्यअध्यक्ष बनण्याची संधी मिळाली होती परंतू के. एम. करिअप्पा आपल्यापेक्षा वरिष्ठ असल्याचं सांगत त्यांनी पद सोडलं होतं. त्यांच्याबद्दल अनेक असे किस्से आणि प्रसंग नोंदवले गेले आहेत जे त्यांना इतर सैन्यअधिकाऱ्यांपेक्षा वेगळं ठरवतात.

राष्ट्रवाद

नाथुसिंह यांच्यासाठी राष्ट्रसेवेपेक्षा मोठी होती राष्ट्रभक्ती. ही गोष्ट तुम्हाला आश्चर्यात टाकू शकते परंतू हे सत्य आहे. वर्ष १९२१ मध्ये सँडहर्स्ट अकॅडमीमध्ये ट्रेनिंग सुरु असताना ब्रिटीश जनरल भाषण देत होते. ते म्हणाले की “इंग्रज अजून बरेच वर्ष भारतावर राज्य करणार आहेत, जे स्वतःला क्षमतावान समजतात त्यांनी सैन्यात भरती व्हावं.” हे ऐकून नाथु सिंह यांनी कमांडेट पास झाले आणि म्हणाले की जर इंग्रज भारता सोडणार नाहीत तर कमीशन घेण्यासाठी ते इच्छूक नाहीत.

राष्ट्रवादाची इतकी प्रखर इच्छा ठेवणाऱ्या नाथूसिंहांना त्यांचे सहकारी बंडखोर म्हणून पहायचे. तर दुसऱ्या बाजूला त्यांना प्रशिक्षण देणारे भारतीय सैन्यअधिकारी नाथुसिंहांना सैन्यातले गांधी म्हणायचे. मेजर जनरल व्ही.के. सिंह त्यांच्या ‘लिडरशीप इन इंडीयन आर्मी’ या पुस्तकात लिहतात की त्यावेळी सैन्यातला एकमोठा गट त्यांचा तिटकारा करायचा कारण नाथुसिंह यांना सुभाषचंद्र बोस(Subhash Chandra Bose) आवडायचे.

सँडहर्स्टमधून उत्तीर्ण झाल्यानंतर सेकेंड लेफ्टिनेंट नाथुसिंह राठोड यांना १/७ राजपूत रायफल्समध्ये नियुक्ती मिळाली. ते राजपूत होते आणि राजपूतानाच्या डूंगुरपूर रियासतीशी त्यांचनातंहोतं. स्वतःला उच्च जातीच असल्याचं सांगत त्यांनी एकाच टेबलावर इंग्रज अधिकाऱ्यांसोबत भोजन करण्यास नकार दिला होता. या कारणामुळं त्यांच्यावर फौजेतून काढून टाकण्यापर्यंतच गंडांतर आलं होतं. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि अकॅडमीमधील विक्रम पाहता त्यांना दुसरी संधी देण्यात आली होती.

फौजेत असताना ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमधील शिखरावरील नेत्यांच्या संपर्कात होते. सांगितलं जातं की एकदा त्यांनी मोतीलाल नेहरुंना (Motilal Nehru)फौज सोडून राजकारणात येण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यावेळी मोतीलाल नेहरुंनी भारतीय फौजेला चांगल्या अधिकाऱ्यांची गरज असल्याचं सांगत नकार राजकारणात येण्याबाबत नकार दिला होता.

नेहरुंच्या पंतप्रधान पदावर उपस्थीत केलं प्रश्नचिन्ह

नाथुसिंह राठोड आणि जवाहरलाल नेहरु यांच्यामधील नातं कधीच सामान्य नव्हतं. मग काश्मिरचा मुद्दा असो की सेनेच्या भारतीयकरणाचा. जेव्हा १९४८मध्ये काश्मीरवर आक्रमण झालं तेव्हा नेहरुंनी लाहोरवर आक्रमण करावं, असा सल्ला नाथुसिंहांनी दिला होता. नाथुसिंहांचं मत होतं की या परिस्थीती पाकिस्तानला गुडघे टेकण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहणार नाही. नेहरुंनी नाथुसिंहाचा हा सल्ला अमान्य केला.

नेहरु आणि नाथुसिंहांचा असाच एक किस्सा प्रसिद्ध आहे. एका उच्चस्तरीय बैठकीत दोघे उपस्थीत होते. नेहरुंनी सैन्यात भारतीय अधिकाऱ्यांची कमतरता पाहता ब्रिटीश अधिकाऱ्यांना आणखी काही वेळ पदावर ठेवण्याचा प्रस्ताव मांडला. नाथुसिंहांनी प्रस्तावाला तडक विरोध केला. ते म्हणाले की “बैठकीत २५ वर्षांहून अधिकचा अनुभव असणारे अधिकारी उपस्थीत आहेत. तुम्हाला पंतप्रधान पदाचा काय अनुभव आहे.” अंतिमतः नेहरुंचा प्रस्ताव संमत झाला. याचे वाईटच परिणाम झाले. काश्मिरवर पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर भारतीय सेनाप्रमुख असणाऱ्या ब्रिटनच्या रॉ के बुचर यांनी नकार दिला होता, कारण पाकिस्तानचे नेतृत्त्वही इंग्रज करत होते. पटेलांनी हैद्राबादवर आक्रमण करण्याचे आदेश दिल्यावेळी सुद्धा बुचर यांनी नाहीचा पाढा वाचला होता. नाथुसिंह योग्य होते, हे नंतर सिद्ध झालं. असे होते सैन्यअधिकारी नाथुसिंह राठोड त्यांच्यासाठी राष्ट्रप्रेम सर्वात मोठी गोष्ट होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button