कोरोनाची लस घेताना मनात शंका येतेय? वाचा हा लेख

कोरोनाचं थैमान आणि लॉकडाऊननंतर आलेली मरगळ बाजूला सारत भारत देश लसीकरणासाठी सज्ज झाला आहे. जनतेसाठी दिलासादायक वातावरण निर्माण झालं आहे.

लॉकडाऊनच्या (Lockdown) सर्व प्रश्नांचं उत्तर कोरोनाची लस होती. हे आपण जाणतो.

काही दिवसानंतर आपल्याला ही कोरोनाची लस घेण्याची संधी मिळणार आहे. परंतू आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात कोरोनाच्या लसीबद्दल संभ्रम आणि अनेक प्रश्न आहेत, शंका आहेत. कोरोनाची लस घेण्याबद्दल तुमच्या मनातल्या साऱ्या शंकाचे निरसण या लेखात आम्ही करणार आहोत.

कोरोना (Corona) प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम १६ जानेवारीला महाराष्ट्रात सुरु झाली. मुंबईसह राज्यभरात लसीकरणाची मोहीम राज्यभरात सुरु झाल्यामुळं दिलासादायक वातावरण निर्माण झालं होतं, पण लसीकरण मोहिमेला ब्रेक लागल्यामुळं पुन्हा अस्वस्थता निर्माण झाली होती. मुख्यमंत्र्यांनी वर्षावर बैठक घेत याविषयी माहिती मागवली. राज्यात २८५ लसीकरण केंद्रांवर लसीकरण मोहीम सुरु असून आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस टोचून घेतल्यास सकारात्मक संदेश लोकांमध्ये जाईल,असं सांगण्यात आलं. कोविन एपवर नोंदणी करुन लसीकरण करावं असं सांगत एपचा वेग वाढण्यासाठी कार्यपद्धती अधिक गतीमान होण्यासाठी  काही जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याच्या सुचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या.

यानंतर दोन दिवस लसीकरणाची प्रक्रिया थांबवण्यात आली होती . लसीत काही दोष असल्यामुळं लसीकरणाला स्थगिती दिली अशा आशयाचे संदेश प्रसारीत झाले. पण कोविन एपमधील तांत्रिक बिघाडामुळे लसीकरणाची प्रक्रिया थांबवण्यात आली होती. आजपासून तिला सुरुवात झाली आहे. तीन दिवसांपूर्वी भारतात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येतीये.  जवळपास अडीच लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यापैकी ४४७ जणांना लसीचे साइड इफेक्ट जाणवलेत. म्हणजे ०.२ टक्के लोकांना या लसीचा त्रास जाणवला.

लसीकरणानंतर होणाऱ्या त्रासाबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सचिवांकडून याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आलीये. लस टोचल्यानंतर जाणवणारा त्रास हा किरकोळ, गंभीर आणि अतिगंभीर स्वरुपाचा असतो.

किरकोळ त्रासात इंजेक्न देण्यात आलेल्या ठिकाणी सुज येणं, हलका ताप, अगदुखी, एलर्जी, घाबरणं आदींचा सामावेश होतो. तर गंभीर तक्रारीमध्ये लस घेतल्यानंतर ताप येतो.

जरी याचा त्रास होत असला तरी जीवावर बेतत नाहीत. गंभीर स्वरुपाच त्रास जरी लस घेतल्यानंतर होत असला तरी दवाखान्यात भरती करण्याची वेळ  येत नाही.

लस घेतल्यानंतर ज्यांना दवाखान्यात भर्ती करावं लागतं त्यांना अतिगंभीर त्रासाला सामोरं जावं लागत नाही. देशात लसीकरण प्रक्रियेदरम्यान तीन लोकांना दवाखान्यात भर्ती करावं लगालं होतं. त्या दोघांना डिस्चार्ज देण्यात आलाय.

कोरोनाच्या लशीबद्दल भीती बाळगावी का?

सद्यस्थितीला भारतात भारत बायोटेकची कोव्हॅक्स आणि ऑक्सफर्डची कोव्हिशिल्ड अशा दोन लसींचे लसीकरण सुरुये. लसीकरण प्रक्रियेदरम्यान अत्यल्प लोकांना याचा त्रास झाल्याचे जाणलंय. तर कोव्हॅक्स लस घेतल्यानंतर काही जणांना त्रासाची लक्षणं जाणवली. ताप येणं, अंगदुखी, सुज अशा तक्रारी ही लस घेणाऱ्यांपैकी तुरळक लोकांना जाणवल्यात. गंभीर स्वरुपाचा त्रास होणारा एकही रुग्ण आढला नाही. यामुळं लस घेण्यापासून दूर पळण्यात काही अर्थ उरत नाही. एखाद्या ठिकाणी जर लोक लसीपासून दूर पळत असतील तर त्यांना लसीबद्दल अपूरी अथवा खोटी माहिती त्यांच्या पर्यंत पोहचली आहे. त्यामुळं काही लोक लस घ्यायला तयार नाहीत.

अनेक संघटना लसीसंदर्भात भारतीयांच्या मनातल्या शंका जाणून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यापैकी एक असणारी लोकल सर्कल्स नावाच्या संघटनेनं केलेल्या सर्वेक्षणानूसार ६९ टक्के जनता लशीबाबत साशंक असल्याच समोर आलंय.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनूसार लसीकरणानंतर गंभीर स्वरुपात कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला दिसत नाही. त्यामुळं अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरणासाठी नोंदणी करुन लस घ्यायला हवी.

Disclaimer:- ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER