साखरझोपेसाठी करा ‘हे’ उपाय

good sleeping

चांगली तब्येत हवी असेल, तर तितकीच चांगली झोपही मिळणे आवश्यक आहे. चांगली आणि पुरेशी झोप न मिळाल्यास चिडचिडेपणा, डोकेदुखी, सुस्तपणा असे अनेक त्रास होऊ शकतात. हल्लीच्या तणावपूर्ण वातावरणामुळे शांत झोप लागण्याची शक्यता तशी फारच कमी असते. तुम्हालाही हीच समस्या भेडसावत असेल तर हे नक्की वाचा…

  • आजकाल प्रत्येकाच्या घरातच नव्हे तर प्रत्येक रूममध्येही टीव्ही असतो. पण यामुळे तुमची झोप खराब होऊ शकते. काही मुलांच्या खोल्या जणू ऑफिसप्रमाणेच झालेल्या असतात. चांगल्या झोपेसाठी तुम्ही लॅपटॉप, टीव्ही आणि स्मार्टफोनला झोपण्याच्या खोलीपासून लांबच ठेवा…तरच छान झोप लागेल.

ही बातमी पण वाचा :  रोज झोपेच्या गोळ्या खाताय?? मघ होऊ शकतो हृदयविकाराचा त्रास..

  • दररोज व्यायाम केल्याने आपण दिवसभर फ्रेश राहणंच नाही, तर रात्री शांत झोपण्यासही मदत होते. दिवसातून अर्धातास ते ४५ मिनिटं व्यायाम केल्याने आपल्या मनातील ताण कमी होतो आणि आपल्याला चांगली झोप लागते. पण झोपण्याच्या अगोदर व्यायाम करू नका. त्याने योग्य आराम मिळत नाही.

  • रात्री पचण्यास जड आणि तिखट पदार्थ खाणं टाळा. फळ व भाजीपाला यांचा तुमच्या आहारात समावेश असावा. त्यामळे आहार संतुलित राहतो. रात्री लवकर जेवल्याने, कपभर दूध प्यायल्यानेही तुम्हाला चांगली झोप लागू शकते. चेरी आणि केळ्याचं सेवन केल्याने, रात्री आरामात झोप लागण्यास मदत होते.

  • रात्री झोपण्याच्या अगोदर थंड पाण्याने अंघोळ केल्याने तुम्हाला मस्त झोप येईल आणि स्वप्न सुंदरही पडतील. अंघोळीच्या पाण्यात थोडंसं तेल टाकल्याने तुम्हाला अजून छान झोप लागेल.

ही बातमी पण वाचा : झोपताना उशी घेत असाल; तर होऊ शकतात ‘या’ समस्या..

  • जर तुम्ही दररोज ठराविक वेळी झोपत असाल तर तुम्हाला त्याच वेळेची सवय लागते. दररोज नियमित वेळेत झोपणं आणि उठणं याची सवय असणं गरजेचं आहे. तुम्हाला लिहण्याची, वाचण्याची, किंवा तत्सम काही करण्याची आवड असल्यास, तुम्ही झोपेच्या अगोदर ते करू शकाल. झोपेच्या वेळेत नियमितता असण्याची सवय लावल्यास तुम्हाला रोजच छान झोप लागू शकते.