संचारबंदीचा भंग करून लाठीचा वापर करण्याची वेळ आणू नका; पोलीस महासंचालकांचं नागरिकांना आवाहन

Sanjay Pandey

मुंबई :- राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. तर वाढत्या कोरोनाच्या (Coronavirus) संसर्गामुळे राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे जनतेने सहकार्य करावे. आम्ही कोणालाही विनाकारण त्रास देणार नाही याची हमी देतो; पण जाणून संचारबंदीचा भंग करून आम्हाला लाठीचा वापर करण्याची वेळ आणू नका, असे आवाहन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी केले.

महाराष्ट्रात संचारबंदी लागू होण्यासाठी अवघा काही वेळ उरला  आहे. यातच पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पत्रकार परिषद घेतली. राज्यात १४४ कलम लागू होत आहे. त्यामुळे पाचपेक्षा जास्त लोकांनी घराबाहेर पडू नये. जर अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडल्यास हरकत नाही. मात्र, जाणूनबुजून नियमांचा भंग करून लाठी वापरण्याची वेळ आणून नका, असेही संजय पांडे (Sanjay Pandey) म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button