पार्टनरची खिल्ली उडवू नका…नाहीतर पडू शकते भारी…

partner

अनेकदा आपण आपल्या पार्टनरच्या काही सवयींवरुन त्यांची खिल्ली उडवण्याची संधी सोडत नाही. पण एका रिसर्चनुसार असे करणे तुम्हाला महागात पडू शकते. तर दुसरीकडे तुमच्या अशा काही सवयीही तुमच्या नात्यात मिठाचा खडा टाकू शकतात. चला जाणून घेऊ तुमची पार्टनरची खिल्ली उडवण्याची कोणती सवय तुम्हाला महागात पडू शकते.

  • आपल्या वैवाहिक जीवनातील खाजगी गोष्टी लोकांशी शेअर करु नये. कधी कधी असं होतं की, कपल्स एकमेकांच्या ज्या सवयींनी किंवा कमतरतेमुळे नाखुश असतात त्या गोष्टी ते आपल्या मित्रांसोबत शेअर करतात. तुमच्या या सवयीची माहिती जेव्हा तुमच्या पार्टनरला लागते तेव्हा तुम्हाला हे चांगलंच महागात पडू शकतं.

ही बातमी पण वाचा : मुलांनाही वाटत असते ‘या ‘ गोष्टींची भीती

  • प्रेमाच्या नात्यात अनेक गोष्टी गृहीत धरण्याची चूक काही लोक करतात. काही लोक बोलताना किंवा वागताना कोणताही विचार करत नाहीत. अशावेळी तुमच्या काही बोलण्याने तुमच्या पार्टनरच्या सन्मानाला धक्का लागू शकतो. त्यामुळे आपल्या पार्टनरचा सन्मान करणे फार गरजेचे आहे. नाही तर नातं तुटू शकतं.

  • अनेकदा काही लोकांना साधी गोष्टही ओरडून सांगण्याची सवय असते. पण या सवयीमुळ मित्रांसमोर किंवा पाहुण्यांसमोर तुम्हाला लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आपल्या पार्टनरसोबत नेहमी नॉर्मल आवाजात बोलणं फायद्याचं होईल.

  • एकत्र राहिल्याने कपल्सना एकमेकांच्या सवयींबाबत माहिती मिळते. ज्यात एकमेकांच्या बोलण्याच्या पद्धतीचीही माहिती असते. अशावेळी काही लोक हे आपल्या पार्टनरच्या बोलण्याच्या स्टाईलचीही खिल्ली उडवतात. भलेही असे करण्यामागचा तुमचा उद्देश त्यांच्या त्या सवयीत बदल व्हावा असा असेल, पण सर्वांसमोर असे करणे तुमच्या पार्टनरला अजिबात आवडणार नाही. त्यामुळे अशा गोष्टी चारचौघात न बोलता एकट्यात समजवा.