गर्दी करू नका घरपोच सेवेचा लाभ घ्या : महापालिकेचे आवाहन

KMC

कोल्हापूर :महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणू (कोवीड-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग
प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करणेत आलेला आहे. कोरोना विषाणू (कोवीड-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. यासाठी शहरातील किरकोळ दुकानदार असोसिएशन (जनरल स्टोअर) यांची वाँड वाईज व संपर्क क्रमांकासह यादी सोबत जोडली आहे.

तरी शहरातील नागरिकांनी घराबाहेर न पडता अन्नधान्य व इतर साहित्याची आवश्यकता भासलेस या यादीतील आपले परिसरातील दुकान दारांना मोबाईलद्वारे संपर्क करावा. त्यांनी सर्व नागरिकांनी साहित्य मागणी नोंदविलेस घरपोच किराणा माल पोहोच करणेबाबत ग्वाही दिलेली आहे. तरी याचा लाभ नागरिकांनी घ्यावा व बाहेर न पडता प्रशासनास मदत करावी असे आवाहन महापौर सौ.निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.