खासगीकरणाविरोधात शिवसेनेने लोकसभेत आवज उठवला ; संजय राऊत आक्रमण

Sanjay Raut .jpg

मुंबई : जेएनपीटी (JNPT), एअर इंडिया (Air India), एलआयसी (LIC) यांचे खासगीकरण करू नका, असे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यसभेत म्हटले आहे. राज्यसभेत मोदी सरकारला धारेवर धरले .

ही बातमी पण वाचा:- केंद्राकडून वादे, दावे खूप; पण करोना पुढे देश मागे हेच वास्तव : शिवसेना

देशाची आर्थिक स्थिती अत्यंत गंभीर आहे, आता परिस्थिती अशी आहे की आमचा जीडीपी आणि आमची आरबीआयही दिवाळखोर झाली आहे, अशा परिस्थितीत सरकारने एअर इंडिया, रेल्वे, एलआयसी आणि इतर बर्‍याच ठिकाणी विक्रीसाठी मोठी विक्री आणली आहे. यात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचा समावेश आहे, असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन जारी केला. मात्र, त्याने काय साध्य झाले, उलट कोणतेही नियोजन न करता लॉकडाऊन केल्याने देशाची अर्थव्यवस्थेची पुरती वाट लागली आणि देश आर्थिक संकटात सापडला आहे, असे सांगत विरोधकांनी मोदी सरकारच्या धोरणावर टीकास्त्र सोडले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER