‘इमोशनल कार्ड खेळू नकोस !’ चौकशीदरम्यान एनसीबी अधिकाऱ्यांनी दीपिकाला बजावले

NCB to Deepika Padukone during questioning.jpg

मुंबई :- ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (NCB) शनिवारी (२६ सप्टेंबर) बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोनची (Deepika Padukone) चौकशी (Interrogation) करण्यात आली. एनसीबीच्या पाच अधिकाऱ्यांनी दीपिकाची चौकशी केली. साडेपाच तास चाललेल्या या चौकशी दरम्यान दीपिका तीन वेळा रडली. यावेळी एनसीबी अधिकाऱ्यांनी इमोशनल कार्ड खेळू नकोस, असे तिला स्पष्ट बजावले. फ्री जर्नालिजमने दिलेल्या बातमीनुसार, दीपिका शनिवारी सकाळी १० वाजता एनसीबीच्या कार्यालयात पोहचली.

यानंतर लगेच तिच्या चौकशीला सुरुवात झाली. या दरम्यान, ड्रग्जसंदर्भात आपण चॅट केले होते, असे तिने कबूल केले. मात्र स्वत: ड्रग्ज घेत असल्याचा इन्कार केला. चौकशीत एकापाठोपाठ एक प्रश्न विचारले जात असताना दीपिकाला अचानक रडू कोसळले. असे एकदा नाही तर तीनदा झाले. तिच्या डोळ्यांत अश्रू आलेत.

दीपिकाला वारंवार रडताना पाहून एनसीबी टीमने तिला स्पष्टपणे बजावले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इमोशनल कार्ड खेळू नकोस, असे अधिका-यांनी तिला स्पष्ट बजावले. रडण्याऐवजी तू सगळ्या प्रश्नांची खरी उत्तरे देशील तर योग्य होईल. खरे सांगितले तर तुझ्या अडचणी कमी होऊ शकतील. तेव्हा रडण्यापेक्षा खरे बोल, असे अधिका-यांनी स्पष्टपणे बजावले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER