शरियत आणि इस्लामी कायद्यात हस्तक्षेप करू नका; उलेमांनी ओवेसींना सुनावले

owaisi

नवी दिल्ली :- अयोध्येतील मशिदीसाठी निधी जमवणे आणि या मशिदीत नमाज पठण करणे हराम आहे, असे स्वयंघोषित मुस्लिम नेता व एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले होते. यावर मशिदीच्या विश्वस्तातील इंडो इस्लामिक फाउंडेशनचे सचिव अतहर हुसैन यांनी ओवेसींना सुनावले – ओवेसी इस्लामच्या शरियतचे  जाणकार नाहीत त्यांनी शरियत आणि इस्लामी कायद्यात हस्तक्षेप करू नये.

ओवेसी म्हणाले होते – अयोध्येत उभारण्यात येणारी मशीद इस्लामच्या सिद्धांतांविरुद्ध आहे. बाबरी मशिदीच्या मोबदल्यात ही जागा देण्यात आल्याने त्यावर बनवण्यात येणारी मशीद नसून ती ‘मस्जिद-ए-जीरार’ आहे. इस्लामच्या सिद्धांतानुसार ती मशीद नाही. त्यामुळे या मशिदीसाठी निधी जमवणे आणि तेथे नमाज पढणे हराम आहे.

या मशिदीसाठीची जमीन सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे ती अवैध ठरत नाही. तसेच याची तुलना ‘मस्जिद-ए-जीरार’शी होऊ शकत नाही. त्यामुळे ओवेसी यांचे म्हणणे अयोग्य आहे. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी राजकारण आणि संविधानाच्या माहितीचे तज्ज्ञ असू शकतात. मात्र, इस्लामच्या शरियतचे ते जाणकार नाहीत. त्यामुळे त्यांनी शरियत आणि इस्लामी कायद्यात हस्तक्षेप करू नये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER