‘कार्तिकी’साठी वारकरी आक्रमक; ठाकरे सरकारला दिला ‘हा’ इशारा

Pandharpur - CM Uddhav Thackeray

पंढरपूर : कोरोनाच्या (Corona) संकटामुळे अनेक महिन्यांपासून  बंद असलेली  विठुरायाच्या मंदिराची दारे कार्तिकी यात्रेला उघडावीत आणि कमीत कमी निर्बंध घालून यंदा कार्तिकी यात्रा होऊ द्यावी, अशी मागणी आज वारकरी संप्रदायाच्या बैठकीत करण्यात आली. आषाढीप्रमाणे कार्तिकी यात्रेला पंढरपूर शहरात संचारबंदी लागू न करता मर्यादित वारकऱ्यांना कोरोनाचे नियम पाळून कार्तिकी यात्रेला येऊ द्यावे.

प्रत्येक मठात ५० भाविकांना उतरण्यास परवानगी द्यावी आणि कार्तिकी एकादशीला सकाळी १२ वाजेपर्यंत वारकऱ्यांना सोशल डिस्टन्स पाळून प्रदक्षिणा करू द्यावी, अशी विनंती या प्रस्तावात केली जाणार आहे. विठ्ठल मंदिर गेल्या नऊ  महिन्यांपासून बंद असल्याने कार्तिकी एकादशीला मंदिराची सर्व दारे उघडावीत आणि भाविकांना मंदिराबाहेरून देवाचे दर्शन घेता यावे, अशीही मागणी वारकरी संप्रदायाने केली आहे.

शासनाने आषाढी यात्रेप्रमाणेच कार्तिकी यात्रेवर निर्बंध घातल्यास वारकरी संप्रदाय येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकेल, असा इशाराही वारकरी संप्रदायाच्या बैठकीत देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER