क्राईम कॅपिटल म्हणून नागपूरला बदनाम करू नका – मुख्यमंत्री

File Pic

नागपूर : नागपूरात खून, बलात्कार, दरोडा अशा गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. त्यामुळे नागपूर उद्या देशाची क्राईम कॅपिटल होऊ नये अशी भीती व्यक्त करत धनंजय मुंडे यांनी सभागृहात अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला होता. सोबतच मुख्यमंत्र्यांचा आपल्या खात्यावर आणि विभागावर दबदबा राहिलेला नाही असा टोलाही मुंडे यांनी फडणवासी यांच्यावर मारला होता.

विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला प्रतिउत्तर देत सभागृहात मुखमंत्री फडणवीस म्हणालेत, विरोधकांना नागपूरचा वाढत विकास बघवत नसल्यानं ते संत्रानगरीला बदनाम करताहेत. नागपुरात विकासाची कामे झपाट्याने होत असल्याने उगाच नागपूरची विरोधक बदनामी करत आहेत. विरोधकांनी जी गुन्हेगारीची आकडेवारी माझ्यापुढे मांडली आहे, ती योग्य नसल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. हत्येचे प्रमाण वाढले आहे, हे मी मान्य करतो परंतु इतर गुन्ह्यांचे प्रमाण कमी झालेत असं ही फडणवीस म्हणालेत.

आघाडी सरकारला इतक्या वर्ष इथला विकास करता आला नाही. भाजप शिवसेना सत्ता आल्यानंतर मात्र नागपूरचा झपाट्याने विकास होतो आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ५ नवीन पोलीस ठाणे आणि स्मार्ट पोलीस ठाणे तयार करण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून बंद पडलेली १०० क्रमांक ही हेल्पलाईन सेवा सुद्धा सुरु करण्यात आल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत.