‘भिऊ नको मी तुझ्या पाठीशी’, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मुकेश अंबानींना आश्वासन

Donald Trump-Mukesh Ambani

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेले दोन दिवस भारत दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी देशातील सर्वात वरच्या २० कंपन्यांच्या सीईओ, चेअरमन यांच्याशी चर्चा केली. यावेळी ट्रम्प यांनी उद्योजकांना वेगवेगळे प्रश्न विचारले. यावेळी रिलायन्सचे मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अमेरिकेच्या उर्जाक्षेत्रामध्ये गुंतवणूक केल्याची माहिती दिली. तसेच महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी अमेरिकेमध्ये १ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले. यावर ट्रम्प खूश झाले.

यानंतर ट्रम्प यांनी तुम्ही ५ जी साठी काही पाऊले उचलत आहात की नाही असा प्रश्न केला. यावर मुकेश अंबानी यांनी हो असे उत्तर देत रिलायन्स ग्रुप ५ जीमध्ये चांगले काम करत आहे. ही एकमेव अशी कंपनी आहे जी चीनच्या मदतीशिवाय देशात ५ जी लाँच करणार आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेशी व्यापारामध्ये मोठी सूट मिळत असल्याचे म्हटले. यावर ट्रम्प यांनी जोपर्यंत मी आहे तो पर्यंत मिळत राहतील असे आश्वासन दिले.

ट्रम्प यांनी यावेळी त्यांच्या विरोधकांवर टीका केली. अमेरिकेतील विरोधकांनी स्टील इंडस्ट्री बंद करून टाकली आहे. ही चांगली बाब नाही. मी आल्यानंतर अ‌ॅल्युमिनिअम व्यापारामध्ये चांगली वाढ झाली आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये स्टील आणि अ‌ॅल्युमिनिअमची मोठी गरज असते. तुम्ही यामध्ये चांगले काम करत आहात, असे आर्सेलर मित्तलचे अध्य़क्ष लक्ष्मी मित्तल यांना ट्रम्प यांनी सांगितले.

भारत- अमेरिकेत तीन अब्ज डॉलर्सचा संरक्षणविषयक करार