डास माणसांइतकाच इतर सजीवांना दंश करुन त्रास देतात का?

Maharahtra Today

पुढच्या महिन्यांपासून पाऊसाला सुरुवात होईल. वातावरण बदलेल. मातीचा गंध, हिरवेगार गालिछे आणि सोबतच डासांचे (Mosquitoes) प्रमाणही वाढेल. जगाला आतंकवाद्याच्या असणाऱ्या धोक्या इतकाच डासांचा धोका आहे. जगातला प्रत्येक व्यक्ती प्रत्यक्ष स्वरुपात आतंकवादाची शिकार होऊ शकत नसली तरी डासांकडून त्यांची शिकार नक्कीच होऊ शकते. डासांमुळे हिवताप, मलेरियापासून (Malaria) ते चिकनगुणीया पर्यंतचे रोग संभवतात. जैवविज्ञानानूसार डासांच्या एकूण साडेतीन हजार प्रजाती आहेत. पृथ्वीवरील इतर सजीवांपेक्षा मानव जमातच डासांपासून त्रस्त असल्याचं चित्र आहे. कधी तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का? ‘माणसांना डास जितकी हानी पोहचवतात तितकी इतर प्राण्यांना ते पोहचवत असतील का? माणसांप्रमाणे इतर जीवांनाही डास चावतात का? ‘

सद्यस्थितीला राज्यसह देशाला कोरोनाने (Corona) विळखा घालताय. यासोबतच इतर रोगराई पसरू नये म्हणून मोठ्या प्रमाणात गाव आणि शहरांमध्ये निर्जंतूकीकरणाचे फवारे फवारले जात आहेत. यामुळं इतर कोणत्या रोगांपासून बचाव होवो न होवो डासांच्या त्रासापासून सुटका होणं शक्य आहे. माणसासाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरलेला किटक म्हणजे डास. या डासांबद्दल अशा गोष्टी ज्या तुम्हाला माहिती असायलाच हव्यात.

डास माणसांना का दंश करतात?

डासांनी माणसाला दंश करणे हा त्यांच्या जीवन प्रक्रियेतला अनिवार्य भाग आहे. या गोष्टीला डास ठरवून सुद्धा टाळू शकत नाहीत. डासांची अन्नसाखळी मानवा व्यतिरिक्त अपूर्ण राहते. यासोबतच तुम्हाला हे माहिती असायला हवं की फक्त मादा डासच तुम्हाला दंश करते. मादा आणि नर दोन्ही प्रकारच्या डासांना जगण्यासाठी ग्लुकोजची गरज असते. पैकी नर डास जोपर्यंत जिवंत असतो तोपर्यंत तो फुलांच्या रसात ग्लुकोज शोधत असतो. मादा डासांची गोष्ट या प्रकरणात वेगळी आहे. मादा जेव्हा अंडी देणार असते तेव्हा तिला पोषणाची सर्वाधिक गरज असते. ग्लुकोज त्यांची ही गरज भागवू शकते. मानवाच्या रक्तात ग्लुकोज शोधून स्वतःचं पोषण करणं यावेळी मादा डासांना सर्वात सोईचं असतं आणि याच कारणामुळं मादा डास ह्या माणसाला दंश करण्यात सातत्य ठेवतात. म्हणजेच तुम्हाला चावणारा प्रत्येक डास ही मादा असते.

पृथ्वीवरील सर्वात चिवट किटक म्हणून डासांकडे पाहिलं गेलं पाहिजे. एखाद्या ठिकाणी डासांनी डोकं वर काढलं तर त्यांना मिटवणं निव्वळ अशक्य असतं. जिवंत राहण्यासाठी शक्य त्या सर्व पर्यायांचा अवलंब डास करत असतात. जिवंत राहण्यासाठी ते मिळेल ती वनस्पती जीव यांच्यावर डंख मारत असतात. त्यामुळे त्यांचं अस्तित्त्व टिकून राहतं. यामुळं डासांवर आलेल्या वेळेनूसार ते कुठे आणि कसं टिकून राहायचं या संधीचा शोध घेत असतात. छतावरील टायरांमध्ये, वनस्पती ठेवलेल्या गमल्यात, रोपांच्या आळ्यात. पाणी जिथं साठेल अशा ठिकाणी डासांचे अस्तित्त्व वाढत असते.

माणसाचं रक्त पिण्याला प्राथमिकता

माणसाला दंश फक्त मादी डास करतात हे तुम्हाला माहिती आहेच. परंतू अशा ठिकाणी डासांची उत्पत्ती झाली जिथं माणसांची वस्ती शेकडो मैलावरही नाही. जसं की जंगल, दुर्मिळ डोंगर, गटारी इत्यादी ठिकाणी डास जन्मले तर मादा डासांना इतर उपाय शोधावे लागतात. नर डास फुलातील रसांमध्ये ग्लुकोज शोधतात. जंगलातले डास पक्षांचे रक्त पिऊन गुजारणा करतात. पक्षांमध्ये आढळणारा बर्ड फ्लू विषाणू माणसात संक्रमित करण्याच काम डासच करत असतात. एक साधारण डास हा विषाणू माणसात संक्रमित करु शकतो.

माणूस आणि जंगलातील पक्षां व्यतिरिक्त काही छोटे उभयचर आणि स्तनपायी जीवांना डास दंश करतात. यात कुत्रे, मांजर, साप, गाई, घोडा, बेडूक, साप, सरडा, खार, अशा जिवांचा समावेश होतो. ऑस्ट्रेलियातले कांगारू सुद्धा डासांपासून वाचू शकले नाहीत. कागांरुसह जगभरातील इतर प्राण्यांनासुद्धा डासांमुळे भयानक रोगांचा सामना करावा लागल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button