घराघरांत जाऊन कोरोनाच्या चाचण्या करा, व्हेंटिलेटरचे ऑडिट करा; मोदींच्या सूचना

PM Narendra Modi

नवी दिल्ली : देशात वाढत चाललेल्या कोरोनाच्या (Corona) रुग्णसंख्येवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी त्यांनी देशभरातील कोरोना परिस्थितीचा आढावा जाणून घेतला. गावागावांत जा, घरोघरी जा आणि कोरोनाच्या चाचण्या करा, असे आदेश देतानाच अनेक राज्यांकडून व्हेंटिलेटरचा वापर केला जात नसल्याबद्दल मोदींनी नाराजीही व्यक्त करत व्हेंटिलेटरचे ऑडिट करण्याचे आदेशही दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोनाची परिस्थिती आणि लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी अधिकाऱ्यांनी मोदींना कोरोना परिस्थितीची माहिती दिली.

देशात कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. मार्चच्या सुरुवातीला सुमारे ५० लाख चाचण्या करण्यात येत होत्या. आता जवळपास १.३ कोटी चाचण्या केल्या जात आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मोदींना दिली. तसेच पॉझिटिव्हिटी रेट घटत असून रिकव्हरी रेट वाढत असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. यावेळी आरोग्य अधिकारीही उपस्थित होते. त्यांनी जिल्हास्तरापासून कोरोनाची स्थिती, ऑक्सिजनची उपलब्धता आणि लसीकरणाची माहितीही देण्यात आली. आरटी-पीसीआर आणि रॅपिड टेस्टची संख्या वाढवण्यात यावी. कोणत्याही दबावाशिवाय राज्यांनी कोरोना रुग्णांची संख्या दाखवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा, असंही मोदी म्हणाले. घरोघरी जाऊन कोरोनाची चाचणी करा.

ग्रामीण भागात आरोग्य सुविधा वाढवा. आवश्यकता भासल्यास अंगवाडी सेविकांनाही सोबत घेण्यास त्यांनी सांगितलं. ग्रामस्थांना गृहविलगीकरणाचे नियम सोप्या आणि समजेल अशा भाषेत समजावून सांगा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. दरम्यान, काही राज्यांमध्ये व्हेंटिलेटरचा वापर योग्य प्रकारे होत नसल्याच्या तक्रारीची मोदींनी गंभीर दखल घेतली. केंद्र सरकारने दिलेल्या व्हेंटिलेटरचं ऑडिट करा, आरोग्य कर्मचाऱ्यांना व्हेंटिलेटर चालवण्याचं प्रशिक्षण द्या, अशा सूचना करतानाच व्हेंटिलेटरचा योग्य वापर होत नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button