पीयूष गोयल यांना राज्यात पाच लोक तरी ओळखतात का? हसन मुश्रीफ यांचा सवाल

Hasan Mushrif - Piyush Goyal - Maharastra Today
Hasan Mushrif - Piyush Goyal - Maharastra Today

कोल्हापूर :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निर्लज्ज राजकारण करणे थांबवावे, अशी टीका केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी केली. मात्र, आता त्यांच्यावरच महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) पलटवार करण्यात आला आहे. गोयल यांना महाराष्ट्रात पाच  लोक तरी ओळखतात का, असा खोचक सवाल महाविकास आघाडीचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे (NCP) नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी विचारला आहे.

हसन मुश्रीफ यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पीयषू गोयल आणि भाजपच्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. कोरोनाच्या मुद्द्यावरून राजकारण होऊ नये, ही स्वत: उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. पीयूष गोयल हे महाराष्ट्राचा अपमान करत आहेत. तसेच भाजप संकटाच्या काळात राजकारण करत असल्याचा आरोपही मुश्रीफ यांनी केला. देवेंद्र फडणवीस हे घाणेरडे राजकारण करत आहेत. ते त्यांनी बंद करावे. भाजपने ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन्स आणि लसींच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवले आहे. मात्र, आम्ही हात जोडून विनंती करतो की, संकटात राजकारण करू नये, असे हसन मुश्रीफ म्हणाले.

पीयूष गोयल काय म्हणाले?
ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून उद्धव ठाकरे यांनी चालवलेल्या क्लृप्त्या पाहून दु:ख झाले. केंद्र सरकार देशात जास्तीत जास्त ऑक्सिजनचे उत्पादन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. सध्याच्या घडीला आपण ११० टक्के ऑक्सिजनची निर्मिती करत आहोत. आतापर्यंत महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी निर्लज्ज राजकारणाचा रोजचा डोस थांबवावा, असे पीयूष गोयल यांनी म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button